नांदेडसोशल वर्क

मेडीकल आधार नांदेडचा वतीने ५० हजार रुपयाचा अत्यावश्यक औषधीसाठा शासकीय रुग्णालयास

नवीन नांदेड। आधार मेडिकल नांदेड मित्र मंडळ यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय व महाविद्यालय विष्णुपरी नांदेड येथे औषधी तुटवडा असल्याने ५० हजार रुपयांच्यी अत्यावश्यक औषधी वैद्यकीय संचालक डॉ.दिपक म्हैसेकर,अधिष्ठाता डॉ.वाकोडे , डॉ.निळकंठ भौसिकर, डॉ.जे.बी.देशमुख औषधी विभाग प्रमुख यांच्या कडे ४ आक्टोबर रोजी दिला.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय व महाविद्यालय विष्णुपरी नांदेड येथे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाना औषधी उपलब्ध नसल्याने सामाजिक बांधिलकी जोपासत आधार मेडिकल मित्र मंडळ नांदेड यांच्या वतीने युवा नेते संजय पाटील घोगरे, गजानन कते,तक्ष पाटील घोगरे, अनिल मोरे, शिवानंद वानखेडे, शुभम वाघमारे, परमेश्वर शिंदे , शिवप्रसाद कुबडे, यांच्या सह मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!