लोहा शहरातील घरकुल लाभार्त्याचे तात्काळ अनुदान काढा-मुख्याधिकारी परळीकर

लोहा। लोहा शहरातील तीन टप्प्यात मंजूर झालेल्या पंतप्रधान घरकुल योजनेतील रखडलेल्या लाभार्त्याना तात्काळ अनुदान देण्यात यावे असा सूचना संबंधित विभागाला मुख्याधिकारी व तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली आहेत.
लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया संपताच तहसीलदार व मुख्याधिकारी विठ्ठल परळीकर यांनी नगर पालिकेत प्रशासन सुरळीत व्हावे यासाठी त्यांनी विभागप्रमुखाना सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील वार्डा वार्डात बंद पडलेल्या फोकस पुन्हा बसविण्यात येणार आहेत.
गेल्या पाच वर्षात शहरातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले नाही .अनेक कामे नियमबाह्य झाली संबधित विभाग प्रमुख श्री नाईक हे पगार वर्षभर मिळाला नाही म्हणून रजेवर गेले होते पण तत्कालीन मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी त्यांना पुन्हा रुजू करून घेतले व घरकुल अनुदान काढण्यास सुरुवात केली पण निवडणूकीमुळे त्यांनी बदली झाली. मुख्याधिकारी म्हणून विठ्ठल परळीकर व प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान मिळावे यात लक्ष घातले आहे. अभियंता नाईक अभियंता शेख याना सूचना देण्यात आल्या पात्र लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठीच्या सूचना मुख्याधिकारी यांनी दिल्या आहेत.
गेल्या अनेक महिन्या पासून घरकुल अनुदानासाठी नगर पालिकेचे उंबरठा झिजविणाऱ्या लाभार्थ्यांना सतेचा मुकुट शिरपेचात असलेल्यानी कधीच सहानुभूती दाखवत त्यांचे अनुदान काढून दिले नाही माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, छत्रपती धुतमल दता वाले, करीम शेख नारायण येल्लरवाड, व नगरसेवकांनी अनेकदा हा प्रश्न सभागृहात मांडला पण त्याची पूर्तता झाली नाही.
मुख्याधिकारी परळीकर यांनी घरकुल योजनेत पात्र लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान देण्याच्या सुचला दिल्या. त्यामुळे लवकरच रखडलेला प्रश्न मार्गी लागला असून आनंदाची बाब होय या निर्णयामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात लवकर अनुदान जमा होण्यास मदत होईल अशी अपेक्षा लाभार्थी पुंडलिक दाढेल यांनी व्यक्त केली आहे.
