हदगाव। तालुक्यात सध्या डेंगु,मलेरिया, हिवताप, काविळ, टायफाईड आणि इतर प्राण घातक विषांणुचा संसर्ग नेहमी तालुक्यात पसरत असल्याने रोगराई दिवसें दिवस वाढत आहे. वरील सर्व रोग निदान करण्यासाठी रक्त तपासणीतुनच रोग निदान सिध्द होते. व तसेच रक्त चाचणी अहवालानुसार रुग्णावर औषधी उपचार केला जातो. रक्त तपासणी केल्यानंतर 2 ते 3 तासातच रक्त चाचणी अहवाल संबंधित रुग्णाला देणे बंधनकारक असते. पण उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथील कार्यरत एच एल एल लाईफ केअर लिमिटेड महा हिंद रक्त तपासणी प्रयोग शाळेत रक्ताचे नमुने घेण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहेत. सदरील रक्ताचे नमुने दुसऱ्या तालुक्याच्या प्रयोग शाळेत नेऊन रक्त तपासणी करुन सुध्दा रक्त तपासणी चाचणी अहवाल किमान 4 ते 5 दिवसानंतर हि रुग्णाला मिळत नाही. या करिता दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी स्थानिक व जिल्हा आणि राज्य प्रशासनाला निवेदन दिले आहे.
गंभिर आजारी रुग्णाला व लहान मोठे शस्त्रक्रिया असलेल्या रुग्णाला रक्त तपासणी करिता व रक्त चाचणी अहवाल देण्यासाठी संबंधित कर्मचारी सतत टाळाटाळ करीत आहे. रक्ताचे नमुनेची तपासणी करण्यासाठी महा हिंद लॅबमध्ये कुठलेही प्रकारचे इ टि डी ट्यूब व ईतर रक्त चाचणी साहित्य लॅब मध्ये उपलब्ध नसतात. संबंधित कर्मचारी रक्त तपासणी अहवाल तात्काळ देत नाही. व तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रक्त तपासणी चाचणी करीता प्रयोग शाळा व तांत्रिक यंत्रणा कार्यरत नसल्याने रक्त तपासणी केल्यानंतर सुद्धा किमान रुग्णाला चार ते पाच दिवसानंतर हि रक्त चाचणी अहवाल मिळत नाही. रक्त तपासणी करिता उप जिल्हा रुग्णालय येथे फार कमी मनुष्यबळ असल्याने सतत गंभिर आजारी रुग्ण, लहान मोठे शस्त्रक्रिया करणारे व्यक्ती, नवजात बालके ,गरोदर माता, वयोवृद्ध व्यक्ती, दिव्यांगाची येथे सतत गैर सोय व हेळसाळ केली जाते.
उप जिल्हा रुग्णालय हदगाव येथे दररोज किमान 600 ते 800 आजारी रुग्ण आरोग्य तपासणी करिता येत आहेत. त्यापैकी काही रुग्णाला डेंगु, मलेरिया, काविळ, टायफाईड, लहान मोठे शस्त्रक्रिया, हिवताप असलेल्या रुग्ण उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेहमी शेकडो रुग्ण येथे भरती असतात. त्यापैकी गंभिर आजार असलेले नवजात बालके, दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध आणि गरोदर माता यांना वारंवार रक्त व लघवी तपासणी करावी लागत आहेत. त्यामुळे हदगाव येथील कार्यरत असलेले महा हिंद रक्त तपासणी प्रयोग शाळेत तपासणी केल्यानंतर सुद्धा तात्काळ रक्त तपासणी अहवाल देत नसल्याने गंभिर आजारावर तात्काळ निदान होत नाही. आणि अति तिव्र आजारी असलेल्या रुग्णाला योग्य औषधी व उपचार मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना आपला जिव रक्त तपासणी अभावी गमवावा लागत आहे.
सध्या महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शासकीय रुग्णालयात 15 ऑगस्ट 2023 रोजी पासुन सर्व प्रकारचे आरोग्य सुविधा विना मुल्य केले आहे. आणि सर्व सामान्यांना इतर खासगी रक्त तपासणी करिता पैसे नसल्याने सरकारी दवाखान्यात रक्त तपासणी व उपचारा करिता येत आहेत. पण रक्त तपासणी करीता गोरगरीब, नवजात बालके, दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता, वयोवृद्ध व्यक्ती यांना या सुविधेचा तात्काळ लाभ मिळत नाही. यासाठी उप जिल्हा रुग्णालय येथील महा हिंद लॅबचे कंत्राटी परवाना तात्काळ रद्द करून उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे 24 तास रक्त व लघवी तपासणी अहवाल देणाऱ्या दुसऱ्या प्रयोग शाळेला कंत्राट देऊन उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे तात्काळ नियुक्ती करावी. अन्यथा पंधरा दिवसानंतर केव्हा ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर सर्व दिव्यांगासह, व रुग्णासह आणि सर्व सामान्य नागरिकासह आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी दिला आहे.