धर्म-अध्यात्मनांदेड

हिमायतनगर शहर व तालुक्यात महिला मंडळींकडून दुर्गामातेचे आंनदाने स्वागत

हिमायतनगर, परमेश्वर काळे| नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गा मातेला स्थापनास्थळी नेण्यासाठी दुष्काळाच्या गर्तेतही महिलांनी जल्लोषपूर्ण वातावरणात तयारी केली असून, अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर दि.१५ रविवारी मुर्त्या खरेदीसाठी मंडळांनी उपस्थिती दर्शवीली होती. उत्सवाच्या आनंदात भक्तांनी भंडारा उधळीत ऑटो, जीप, टेम्पो, ट्रॅक्टर आदीसह मिळेल त्या वाहनाने मातेला स्थापना स्थळी नेतानाचे दृश्य पहावयास मिळाले. यावेळी उदे ग आंबे उदेचा जयकारा करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी मातेची प्राणप्रतिष्ठापना करून आराधना सुरु झाली.

विघ्नहर्त्या गणेशोत्सावानंतर भाविकांना नवरात्र उत्सवाचे वेध लागले होते. अखेर या उत्सवाची प्रतिक्षा रविवारी संपली. दुर्गा मातेच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी मिळेल त्या वाहनाने मातेला गावी नेण्यासाठी महिला, पुरुषांनी शहरासह ग्रामीण भागातील तालुक्याच्या ठिकाणी दुष्काळी काळ असताना देखील उपस्थितीत झाल्या होत्या. या उत्सवासाठी दुर्गात्सव मंडळासह भाविकांनी मागील काही दिवसापासून तयारी करून मुर्त्यांची बुकिंग आणि वॊटरप्रूफ मंडप उभे केले.

यंदा जल्लोषपूर्ण व मोठ्या आनंदाने मुर्त्या खरेदी करून रेणुका, सप्तशृंगी, महालक्ष्मी अनुसया आदींची प्रतिकृती असलेल्या मूर्त्यांना विशेषतः तेलंगाना भागातील महिलामंडळांनी मागणी केल्याचे दिसून आले. धुमधडाक्यात उत्सव साजरी होत असल्याने ठिकठिकाणी साउंड सिस्टिम, डेकोरेशन व दांडिया गरबा खेळून उत्सव साजरा केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. सायंकाळी स्थापना स्थळी नेल्यानंतर उत्सहात आरती महापूजा करून दुष्काळाचे संकट दूर करून यावर मात करण्याची शक्ती सर्वाना देण्याचे साकडे घालत मातेची आराधना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!