करियरनांदेड

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातर्फे “बालरक्षा” किटचे वितरण

नांदेड| नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नांदेडच्या वतीने आज 13 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता नांदेड-वाघाळा शहर संचलीत वजिराबाद येथील माध्यमिक महानगरपालिका शाळेत बाल रक्षा किटचे विनामूल्य वितरणास मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. आयुष मंत्रालयाच्याअंतर्गत अखिल भारतीय आयुर्वेद संस्था नवी दिल्ली यांच्याद्वारा विकसित केलेली आयुर्वेदीय औषधींची किट ही शालेय बालकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणे तसेच त्यांचा विविध व्याधीच्या संक्रमणापासून बचाव करण्याकरीता अत्यंत उपयुक्त आहे.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नांदेडच्या या उपक्रमामुळे परिणामी नांदेड शहरातील मुलांच्या आरोग्याचा स्तर वाढेल. शालेय मुले सुदृढ व सशक्त झाल्यास शाळेतील उपस्थिती वाढेल, परिणामी नांदेड शहरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल असा आशावाद मनपा आयुक्तांनी या प्रसंगी व्यक्त केला. अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांनी या उपक्रमामागील भूमिका विशद करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांना त्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले.

मनपा संचलित सर्वच प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य निरोगी रहावे यासाठीच सदर आयुर्वेदीय औषधींचे बालरक्षा किटचे वितरण करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाच्या वैद्यकीय चमूने सर्व शालेय विद्यार्थ्यांना बालरक्षा किट वितरित करून त्यातील चारही औषधांविषयी पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे विस्तृत स्वरूपात त्याची उपयोगिता व त्याचे सेवनाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमात उपायुक्त ॲड. अजितपाल सिंह संधू, मनपा शिक्षणाधिकारी राजेश पातळे, आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन सिंग, शासकीय आयुर्वेद रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. मंजुषा पाटील, शाळेचे मुख्याध्यापक साईनाथ चिद्रावार, डॉ. प्रसाद देशपांडे आणि डॉ. देवकुमार राऊत आणि वैद्यकीय चमूतील सर्व सदस्य उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!