नांदेडसोशल वर्क

ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रम अंतर्गत सिडको येथे प्रात्यक्षिक

नवीन नांदेड। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती अंतर्गत वाघाळा सिडको परिसरातील ढवळे काॅर्नर,अण्णा भाऊ साठे चौक येथे २ जानेवारी रोजी नागरीकांच्या उपस्थित प्रात्यक्षिक सादर करून दाखविण्यात आले.

महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी विकास माने व तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अनिल धुळगंडे, तलाठी चंद्रकांत कंगळे, कोतवाल अविनाश इंगळे, निर्देशांक विवेकानंद मुधोळकर यांच्या उपस्थितीत महिला युवक, जेष्ठ नागरिक यांना प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले, या जनजागृती अभियानाला सिडको परिसरात प्रतिसाद मिळाला.

यावेळी संबंधितांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन बाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. ढवळे चौक, हडको , लातूर फाटा या भागासह ग्रामीण भागात जनजागृती अभियान अंतर्गत सादरीकरण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!