करियरनांदेड

लहुजी शक्ती सेनेच्या महाराष्ट्र संघटक पदी नागोराव आंबटवार यांची निवड

नांदेड| लहुजी शक्ती सेनेची महाराष्ट्राची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये नांदेड येथील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते नागोराव आंबटवार यांची महाराष्ट्र संघटक पदी निवड करण्यात आली आहे. लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णु कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी ह्या निवडी जाहीर केल्या आहेत.

लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णु कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात संघटनेच्या माध्यमातून समाज कार्य सुरू आहे. मातंग समाजाच्या समाजिक उन्नतीसाठी संघटनेचे मोठे कार्य आहे. नांदेड जिल्ह्यात ही संघटनेचे मोठे जाळे आहे. प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी राज्यातील कार्यकारणी घोषीत केली असून नागोराव आंबटवार यांची संघटनेच्या महाराष्ट्र संघटक पदी निवड करण्यात आली. या निवडी बद्ल कोअर कमिटीचे जिल्हाध्यक्ष संतोष सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघमारे, राज्य कार्यकारणी सदस्य रविकांत पवळे, कार्याध्यक्ष स्वप्निल गव्हाणे, बालाजी मेकाले, गजानन वाघमारे यांच्यासह आदिंनी अभिनंदन केले आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!