क्राईमनांदेड

बारड बसस्थानक परिसरात १३ तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

नांदेड। बारड बसस्थानक परिसर व शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने आज बारड बसस्थानक परिसरात अचानक धाडी टाकून एकूण १३ तंबाखू विक्रेत्यांकडून 7 हजार 600 रुपये दंड आकारण्यात आला. 

ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील व वैद्यकीय अधिक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. उमेश मुंडे, जिल्हा फ्लोरोसिस अधिकारी डॉ. अर्चना तिवारी, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक, नागेश आटकोरे व सुनील तोटेवाड तसेच  बारड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता ढगे, नागेश ढोरे व राम बोचरे उपस्थित होते. 

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!