नांदेडलाईफस्टाईल

पतंजलीच्या हडको येथील योग शिबिराची होम-हवन करून थाटात झाली सांगता

नवीन नांदेड| श्री बालाजी मंदिर देवस्थान आनंद सागर सोसायटी हडको नांदेड येथे चालत असलेल्या 11 दिवसीय निशुल्क योग शिबिराचे आज समारोप करण्यात आला. 10 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2023 असे 11 दिवस सकाळी 5.30 ते 7.00 दरम्यान हडको व सिडको येथील साधकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात श्री अनिल अमृतवार यांनी अकरा दिवस मार्गदर्शन केले.

निशुल्क योग शिविरात ददरोज आसन, प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम, योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार, दंड, बैठका, ध्यान आदिचा सराव करून घेण्यात आला. तसेच आहार, दिनचर्या, विरुद्ध आहारा बद्दल माहिती सांगितली. शिबिरा दरम्यान सर्व साधकांना रोज आवळा, अलवेरा, लिंबू,गुळवेल, गाजर, बीट यांचा ज्यूस तसेच दिव्यपेय मटकी व मुगाचे उसळ आदी देण्यात आले. शेवटच्या दिवशी जगन्नाथ येईलवाड यांनी महाप्रसादाचे आयोजन केले.

शिबिर समारोप कार्यक्रमास श्री दत्तात्रय काळे राज्य प्रभारी, संजीवनी माने सह राज्य प्रभारी, मधुरी शास्त्री राज्य कार्यकारणी सदस्य, उर्मिला साजने राज्यसंवाद प्रभारी, नंदिनी चौधरी नांदेड जिल्हा प्रभारी, राम शिवपनोर नांदेड जिल्हा प्रभारी, हनुमंत ढगे संघटन मंत्री नांदेड, यांची विशेष उपस्थिती होती. नारायणराव कुलकर्णी व यादव भांगे यांनी शिबिर सामानपणाच्या दिवशी संकल्प यज्ञ केला. सर्वसाधारकांनी वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करत यज्ञामध्ये आहुती दिल्या. 11 दिवसीय शिबिरा दरम्यान किशन भवर व सोपानराव काळे यांनी कठीण आसन, जलनीती, सूत्रनीती आदीचा सत्कार करून सराव करून घेतला.

याप्रसंगी सर्वश्री अरुण दमकोंडवार, चंद्रकांत नागठाण, संतोष बच्चेवार, गोविंद पेडगुलवार, राजू शेट्टे, दिलीप कदम, विजय गुंडाळे, सूर्यकांत शिरनेवार, श्रीराम मोरे, शैलेंद्र पालदेवार, जगन्नाथ येईलवाड, राधाबाई येईलवाड, काशिनाथ मटके, गंगाधर कोट्टाकलुरे, गोविंद बच्चेवार, शिवाजी पेंसलवार, रामकृष्ण चक्रवार, भागवत भातलावंडे, प्रसाद भातलावंडे, भास्कर पोधाडे, जयवंत सोमवाड, शिवाजीराव शिंदे हळदेकर, बालाजी वारकड, विलास मामीरवाड, मंगला मामीडवाड, सतीश पाटील, पांचाळ बाई, ललिता कदम, पार्वती धनगरे, शोभाबाई सोमशेटवार, बेबीताई गोपीले, आशाताई गेंडाफळे वंदना चव्हाण, वर्षा राठोड, वंदना एकलारे, गंगासागर भालेराव, जयश्री सूर्यवंशी, श्रीनिवास शेळके, ऋतिक सरोदे, अनिकेत भोईवारे, गौरव भंगारे, गणेश भंगारे, सात्विक चव्हाण, देविदास लाटकर, अनिल कामिनवार आदी साधक उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!