नांदेड

तुलजेश यादव यांच्या वाढदिवसा निमित्त लाडकी बहीण योजना नावनोंदणीला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद ..

नांदेडl नांदेड दक्षिण शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक तुलजेश यादव यांच्या वाढदिवसा निमित्त होळी नांदेड येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस ऑनलाइन व ऑफलाईन नावनोंदणी शिबिरास महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला व आनलाईन नोंदणी केली.

दि 17 जुलै रोजी नांदेड दक्षिणशिवसेना शहर प्रमुख तुलजेश यादव यांच्या वाढदिवसा निमित्त लाडकी बहीण योजने अंतर्गत नाव नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या भागातील महिलांनी ऊत्सफुर्त प्रतिसाद दिला.

नांदेड दक्षिण जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोढारकर तालुका प्रमुख दक्षिण उध्दव पाटील शिंदे,भाजपा शहर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या सह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या ,यावेळी मदतनीस अंगणवाडी सेविका यांनी नावनोंदणी केली तर मित्र परिवाराने सहकार्य केले, कार्यक्रम यशस्वीते साठी मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!