
हिमायतनगर | हु.ज.पा.महाविद्यालय, हिमायतनगर येथे आज दि.१२जानेवारी २०२४रोजी प्राचार्य डॉ.उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांच्या अधक्षिय मार्गदर्शनाखाली संस्कृतिक विभागातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती थाटामाटात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.उज्जला सदावर्ते मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉ.लक्ष्मण पवार व इंगजी विभागप्रमुख प्रा.प्रवीण सावंत सर होते.मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
डॉ.लक्ष्मण पवार सरांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच बालपण,जीवनचरित्र सांगून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर केलेले संस्कार,शिकवण सांगितली.मा जिजाऊ मुळेच स्वराज्याचे बीज छ.शिवाजी महाराजांच्या मनात पेरले गेले .जिजमातेचे संस्कार पुढील पिढीने आत्मसात करून देशाचे कल्याण करावे असे त्यांनी सांगितले.
प्रा.प्रवीण सावंत म्हणाले की स्वामी विवेकानंद यांची जयंती आपण ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरी करीत आहोत कारण आपला देश युवकांचा देश आहे. स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना मोलाचे मार्गदर्शन केले,त्यांची अभ्यासुवृती,भाषण कौशल्य, निडरपना,त्याग भावना,देशप्रेम युवकांनी अंगिकारले पाहिजे .स्वामी विवेकानंदांचे बालपण ते जागतिक परिषदे पर्यंतचा जीवनपट सांगून तो आदर्श विद्यार्थ्यानी घ्यावा असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.त्यात डॉ.उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यामागचे कारण विद्यार्थ्याना सांगून महापुरुषांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून वागले तरच स्वताचा व देशाचा विकास होईल असे सांगितले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सविता बोंढारे यांनी केले.या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
