
हिमायतनगर। येथील हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयात खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या पुढाकाराने फर्स्ट फ्लाय कार्पोरेशन च्या माध्यमातुन नोकरी पुर्व मार्गदर्शन (प्रशिक्षण) शिबिर दि. २३ मंगळवारी संपन्न झाले.
ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम मिळावे, यासाठी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील सतत प्रयत्न करत असतात, ग्रामिण भागातील तरूणांना नोकरी मिळण्यासाठी मोठ्या शहरातील कंपन्याचे उंबरठे झिजवण्या पेक्षा त्यांच्या शैक्षणिक पात्रते नुसार जिल्हा, तालुका स्तरावरून नेमणुक व्हावी यासाठी दि. २७ शनिवारी हिंगोली रामलिला मैदान व दि. २८ रविवारी उमरखेड येथे जिल्हा परीषद शाळा मैदानावर नोकरी महोत्सव शिबीर आयोजीत करण्यात आले असुन यात नामांकीत ७० कंपन्यात ७ हजार रिक्त जागांवर नोकऱ्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्याचाच एक भाग म्हणुन फस्ट फ्लाय कार्पोरेशन च्या माध्यमातुन हुतात्मा जयवंतराव पाटिल उच्च महाविद्यालयात नोकरी मुलाखत पुर्व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
शिबिरात फस्ट फ्लाय कार्पोरेशनचे संचालक निलेश शेलार यांनी मुलाखतीस सामोरे जाण्यापुर्वीची तयारी साध्या सोप्या भाषेत विस्ताराने सांगितली, खासदार हेमंत पाटील यांना हिंगोलीतील एमआयडिसीत विज, पाणी उपलब्ध करून देण्यात यश आल आहे, ते काम पुर्ण होताच अनेक कंपन्या आनण्यास खासदार साहेब आग्रही आहेत, अस सांगत भविष्यात हिंगोली औद्योगिक वसाहतीतील कंपन्यात काम करण्याची संधी मिळण्या करीता इतर शहरातील कंपन्यात नोकरी करून मिळवलेल्या अनुभवाच्या जोरावर पुढील काळात नोकरीसाठी लांबच्या शहरात जाव लागणार नाही हे पटवुन सांगितल, वाढत्या वयातील वर्ष व्यर्थ घालुन गमावु नका तर प्रत्येक वर्षी नोकरीतुन काहीतरी कमावण्याचा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी व्यास्पिठावर, हुजपा महाविद्यालयाचे करीअर कट्टा समन्वयक डॉ.दत्ता मगर, सहाय्यक डॉ. स.जलील, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, राहुल गडकरी, डॉ. संघपाल इंगळे, प्रा. वाकरडकर, गजानन गोपेवाड, प्रभु पोराजवार, खासदार हेमंत पाटिल यांचे जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार, संदिप वाहुळे, अविनाश कांबळे व नोकरीसाठी इच्छुक तरूण तरूणींची उपस्थिती होती.
