क्राईमनांदेड

घटनेच्या निषेधार्थ हिमायतनगर बाजार पेठ दुपारपर्यंत बंद; आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी

हिमायतनगर| हिमायतनगर येथील माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांचेवरील चाकू हल्ला प्रकरणी दोन्ही जखमींवर नांदेड येथे उपचार सुरु असल्याने पोलिसांनी खाजगी रुग्णालयात जाऊन दोघांचेही जवाब घेतले. दोघांनी ही दिलेल्या फिर्यादीनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूणच हिमायतनगर शहरात घडलेल्या चाकू हल्ल्याचा प्रकार तुम्ही आमची बदनामी का…? करता, व तसेच जुन्या राजकीय वादावरून घडली असल्याचे पोलीस डायरीवरील नोंदीवरून समोर आले आहे. दरम्यान आज माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी परमेश्वर मंदिरासमोर जमा होऊन मुख्य रस्त्याने मोर्चा काढून पोलीस ठाण्यात तासभर ठिय्या आंदोलन करून विविध मागण्याचे निवेदन पोलिसांना दिले.

याबाबत सविस्तर पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी कि, पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कुणाल पि. रामराव राठोड वय 40 वर्ष व्यवसाय आरामशीन रा. बाजार चौक, ता. हिमायतनगर जि नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.02/07/2024 रोजी 23:30 वाजताचे सुमारास परमेश्वर मंगल कार्यालयासमोर स्कुटीवर बसुन मोबाईल बघत आसताना आरोपी राम संजय सुर्यवंशी रा. हिमायतनगर, जि नांदेड हा फिर्यादी समोर येवून म्हणाला की, तुम्ही आमची बदनामी का..? करता असे म्हणला यावेळी फिर्यादी म्हणाला की आम्ही तुमची बदनामी कशाला कराव. असे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड म्हणत असतानाच रागाच्या भरात  आरोपीने त्याचे हातातील चाकू (खंजीर) ने फिर्यादीचे उजव्या मांडीवर मारून गंभीर जखमी केले.

तसेच शिवीगाळ करून त्याचे हातातील पंचने फिर्यादीचे डावे कानावर मारून जखमी केले. या घटनेतील साक्षीदार हा भांडण सोडवण्यास गेला आसता त्यालापण शिवीगाळ करूण जिवे मारण्याची धमकी दिली. अश्या प्रकारचा जबाब दिल्यावरून हिमायतनगर  पोलीसांत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे हे करीत आहेत. 

तर दुसरा जखमी फिर्यादी राम संजय सुर्यवंशी वय 21 वर्ष व्यवसाय शेती रा. हिमायतनगर जी.नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मी शेतातून परमेश्वर मंदीर मंगल कार्यालय परिसरात आलो आसता    कुणाल रामराव राठोड रा. हिमायतनगर यांने आवाज देवून थांबविले व तसेच मला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. फिर्यादी म्हणाला की. मला का ..? शिवीगाळ करतो असे म्हणता मादर चोदा तुझ्या ………. असे म्हणाला आणि जुन्या राजकीय वादावरून फिर्यादीस थापडबुक्याने मारहाण केली.व तुला खतम  करतो, म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. व तसेच जवळील चाकूने डाव्या हातावर वार करून जखमी  केले. वगैरे जबाबावरून हिमायतनगर पोलीसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास जमादार श्रीमती कोमल कागणे ह्या करीत आहेत.  

चाकू हल्ला घटनेच्या निषेधार्थ बाजार पेठ दुपारपर्यंत बंद
हिमायतनगर येथील माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यांच्या निषेधार्थ गुरुवारी बाजार पेठ दुपार पर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. श्री परमेश्वर मंदिर परिसरात सर्व पक्षीय पदाधिकारी व नागरिक जमून परमेश्वर मंदिर ते पोलीस ठाणे या दरम्यान मोर्चा काढून हल्लेखोरास तात्काळ अटक करावी, हद्दपार करण्यात यावे आणि 307 कलम लावण्यात यावी. तसेच माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड राठोड यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर या मागणीचे सामूहिक निवेदन पोलिसांना देण्यात आले.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!