क्रीडानांदेड

400 मी धावणे स्पर्धेत हदगावच्या आनंद कदमने विभागातून प्रथम क्रमांक पटकावला; मा. आ. नागेश पाटील अष्टिकर यांनी केले अभिनंदन

हदगाव/नांदेड। हदगाव येथील श्री दत्त कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयचा 12 वी विज्ञान वर्गात शिकत असलेला विद्यार्थी आनंद कदम याने 400 मी धावणे स्पर्धेत विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे, त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातील नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन लातूर याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री दत्त कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हदगावचा इयत्ता 12 वी विज्ञान वर्गात शिकत असलेला विद्यार्थी खेळाडू आनंद शिवाजीराव कदम याने 400 मी धावणे स्पर्धेत विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याची निवड राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा चंद्रपूर येथे झाली आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार नागेश पाटील अष्टिकर, प्राचार्य डॉ. स्वामी एस डी व कार्यालयीन अधीक्षक बंडू पाटील , प्रा. अभय शिंदे सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्याचे स्वागत केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूस प्रा.अजय चौधरी सर आणि ओमकार पवार यांचे मार्गदर्शन लाभले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!