नांदेडलाईफस्टाईल

नायगाव येथे मनोज जरांगे पाटलांची सभा लक्षवेधी ठरणार

नायगाव, रामप्रसाद चन्नावार| मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने नायगाव येथे भव्य सभा दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी होणार असून त्यासाठी पन्नास एकर क्षेत्रावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची सर्वात मोठी सभा नायगाव येथे दिनांक ८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.

यासाठी हनुमान मंदिर येथील बैलबाजार मैदानावरील पन्नास एकर क्षेत्रावर सफसफाईसह सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून सभेसाठी दोन लाख मराठा बांधव येणार असल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे सभेच्या ठिकाणी १० एलीईडी वॉल स्क्रीन, १५० भोंगे २५ मोठे सांऊड, शहरात २० कमानी, २०० व्हॅटचे १००० फोकस, जनसमुहाच्या नियंत्रणासाठी सहा ड्रोन कॅमेरे, मैदान परिसरात पाणी बॉटलांसह चार लाख पाणी पाकीट व पन्नास टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे तर महिलांसाठी स्टेजच्या डाव्या बाजूला बसण्याची व्यवस्था करण्यात आली.

जरांगे पाटलांच्या आगमनासाठी ३०० फूटाचा रॅम्प तयार करण्यात आला आहे सभेच्या जनजागृतीसाठी ५०० बॅनर व ३००० स्टिकरची व्यवस्था करण्यात आली आहे सभा यशस्वीतेसाठी १५०० युवा स्वंयसेवक व ५०० युवती स्वंयसेवकांची जबाबदारी पार पाडणार आहेत सभेपूर्वी शाहीर राजेंद्र खड्सकर पुणे यांचा शाहीरी जलसा व प्रबोधनकार ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकर यांचे किर्तन होणार असून सभेसाठी येणाऱ्या समाज बांधवांसाठी पिंपळगाव पाटीजवळ, जयराज पॅलेस व धन्जे कॉम्प्लेक्स दत्तनगर येथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तर पार्किंगसाठी नांदेड मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी कुसूम लॉन्स, जयराज पॅलेस व अंबेकर प्लॉटींग येथे पाकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

शेळगावमार्गे येणाऱ्या वाहनांची पार्किंग यमुनाबाई मुलींचे हायस्कूल, जनता हायस्कूल, एरीकेशन कॅप व राजूरा मंदिर परिसर येथे नरसीमार्गे येणाऱ्या वाहनाची पार्कींग कुंटूरकर पेट्रोल पंप च्या बाजूस, पिपळगाव पाटीच्या दोन्ही बाजूला, बेटकबिलोली रोड वर मद्रेवार फॅमेली शॉपच्या समोर येथे तर गोदमगाव व लालवंडी मार्गे येणाऱ्या वाहनांची व्यवस्था कृषी महाविद्यालय नायगाव, गोळेगाव रोडकडील प्लाटींग नायगाव येथे करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांचे नायगाव येथे जंगी स्वागत होणार असून उपोषणकर्ते गजू पाटील हिप्परगेकर, सतीष पाटील हिप्परगेकर, चंद्रकांत पा. पवार, प्रताप पा. सोमठाणकर सह पाच जनांच्या हस्ते स्वागत झाल्यानंतर पुष्पवृष्टी होत सभेच्या दिशेने रवाना होतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नानी पार्क, ३०० फुट रॅम्प मार्ग आगमन होताच ५१ तोफांची सलामी देण्यात येणार आहे नायगाव, उ मरी, धर्माबाद, बिलोली, देगलूर व मुखेड सह आदी तालुक्यातून शेकडो मराठा समाज बांधव सभेसाठी एकत्र येणार असल्याने मोठी गर्दी होण्याचे संकेत असून सभेसाठी येताना मौल्यवान वस्तू व जास्तीचे पैसे खिशात ठेवू नये किंवा सोबत आनू नये असे आवाहन करण्यात आले असून सदरील सभा यशस्वी करण्यासाठी सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून सकल मराठा समाज बांधव परिश्रम घेत आहेत.

1) 51 तोफाच्यां सलामीने जरांगे पाटील यांचे स्वागत होणार.
2) जरांगे पाटील यांच्या वर पुष्पवृष्टी होणार.
3) सभेला येतानां मौल्यवान वस्तू व जास्तीचे पैसे खिशात ठेवू नये किंवा आणू नये……

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!