नांदेडलाईफस्टाईल

समिती व ‎सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी‎ बहाणेबाजी करतेय – मनोज जरांगे पाटील

हदगाव| आमच्या अनेक पिढ्यांपासून आम्ही कुणबी‎‎ मराठा आहोत. संबंधित ‎‎समितीला आम्ही कुणबी‎‎ मराठा असल्याचे पुरावे‎‎ सापडत नाहीत. आरक्षण ‎‎बनवायला पुराव्याचा आधार‎‎ लागतो, असे समितीने‎ सांगितले. त्यानंतर समिती हैदराबाद येथे गेली. ‎तिथे मराठा कुणबी असल्याचे पाच हजार पुरावे‎ समितीला सापडले. तरीही संबंधित समिती व ‎सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी‎ बहाणेबाजी करत आहे. असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी हदगाव ‎येथील सभेत केला.‎

शेंबाळ पिंपरी (ता. पुसद) येथून तळणी मार्गे‎ निवघा व नंतर हदगाव येताना मनोज जरांगे ‎पाटील यांचा हदगाव तालुक्यातील तळणी, उमरी ‎(भा.), निवघा (बा), धानोरा (रु.), रुई,‎ मानवाडी फाटा, हडसणी, हरडफ येथे भव्यदिव्य ‎सत्कार करण्यात आला. हदगाव येथे वाजत गाजत जेसीबी‎द्वारे पुष्पवृष्टी करत जल्लोषात त्यांचे स्वागत‎ करण्यात आले. निवघा (बा) येथे सकल मराठा‎स माजाच्या वतीने आयोजित केलेल्या हदगाव ‎येथील सुमन गार्डन मंगल कार्यालयात सभा ‎घेण्यात आली. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आता ‎सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी‎ मराठा प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर मी ठाम ‎आहे.

माझा समाज माझ्यासाठी माय बाप आहे‎आणि या माय बापाशी मी गद्दारी करणार नाही.‎ राज्य सरकारने अंतरवाली सराटी येथील उपोषण‎ व आंदोलन उठवण्यासाठी अनेक डावपेच रचून‎आपल्याला नाहक त्रास दिल्याचेही यावेळी ‎जरांगे पाटील म्हणाले. यापुढे मराठा‎ आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करा, उपोषण ‎करा. पण कुठेही जाळपोळ, उद्रेक,रास्ता रोको,‎आत्महत्या करू नका. आपल्या न्याय्य‎ हक्कासाठी शांततेने सरकारशी लढा देण्यासाठी‎ येत्या १४ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील ‎आंतरवाली सराटी येथे प्रत्येक कुटुंबातील ‎बांधवांनी यावे, असे आवाहनही मनोज जरांगे‎ पाटील यांनी यावेळी केले.‎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!