क्रीडानागपूर

भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव श्रीमती मीनाक्षी गिरी यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार

नाशिक। स्व. उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाऊंडेशन, नाशिक व डी.एस.एफ., नाशिक यांच्याकडून कर्तबगार महिला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. ॲड.राहुल ढिकले(आमदार, नाशिक पूर्व) अशोक दुधारे शिवछत्रपती पुरस्कार विजेते उपस्थित होते प्रमुख अतिथी ॲड.राहुल ढिकले(आमदार, नाशिक पूर्व) यांनी आलेल्या पुरस्कारांना क्रीडा क्षेत्राबद्दल माहिती व महत्त्व आणि मार्गदर्शन केले. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र च्या सचिव श्रीमती मीनाक्षी गिरी यांना ॲड.राहुल ढिकले(आमदार, नाशिक पूर्व) यांच्या शुभहस्ते मानपत्र व समानचिन्हं देऊन गौरव करण्यात आला.

मिनाक्षी गिरी यांनी टेनिस क्रिकेट महाराष्ट्र खेळाचा प्रचार प्रसार व खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल या कामाची दखल घेऊन त्यांना कर्तबगार महिला पुरस्कार (क्रीडा मार्गदर्शक ) 2024 चा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला मिनाक्षी गिरी याना क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट फाउंडर कन्हैया गुज्जर, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वूमन डायरेक्टर धनश्री गिरी, विलास गिरी ,स्वप्निल ठोंबरे, ,नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड , ,सिध्देश गुरव अविनाश वाघ, आनंद चकोर महेश मिश्रा दीपक निकम यांनी यांनी सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!