नांदेडसोशल वर्क

एक वही एक पेन देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

नवीन नांदेड| ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिडको येथील वृत्तपत्र विक्रेता टिन शेड येथे प्रा. मधुकर गायकवाड यांच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता व विधार्थी यांना एक पेन व एकवही देऊन अभिवादन करण्यात आले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी सिडको येथील वृत्तपत्र विक्रेता टिनशेड सेंटर येथे डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विघादान कोचिंग क्लासेसचे प्रा.मधुकर गायकवाड, यांच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता व शालेय विद्यार्थी यांना एक पेन एक वही वाटप करून अभिवादन करण्यात आले,यावेळी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सतिश कदम,जेष्ठ विक्रते शेख सयोध्दीन, बालाजी दमकोंडवार, गणेश डोळस यांच्या सह तातेराव वाघमारे, सुताडे,अमोल नांदेडकर,गणेश कांबळे, व वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!