क्राईम

रुग्णालयात उपचारादरम्यान पारवा बुद्रुक येथील गैस स्फोटाच्या घटनेतील चौथ्या व्यक्तीचा मृत्यू

वडगाव /पोटा। पारवा बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी भीमराव माने यांच्या घरी अचानक रात्री आठच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरच्या झालेल्या स्फोटामध्ये जखमी झालेल्या पाच व्यक्ती पैकी दिनांक 23 सप्टेंबर रोज शनिवारी गजानन बालाजी माने वय अंदाजे 26 यांचे मुंबई येथील जेजे हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे गावावर व परिसरावर शुभ काळा पसरली आहे.कुटुंबातील या घटनेत पाच व्यक्ती गंभीर रित्या होरपळले होते पाच पैकी दिनांक 17 सप्टेंबर रोजी दोन व्यक्तीचा वदिनांक 18 सप्टेंबर रोजी एका व्यक्तीचा तर दिनांक 23 सप्टेंबर रोजी चौथ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पारवा बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी भीमराव माने यांच्या घरी दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता घरगुती गॅस सिलेंडरच्या स्पोर्ट होऊन घटनेत जखमी झालेल्या पाच व्यक्ती पैकी दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता बालाजी भीमराव माने कुटुंबप्रमुख व राधाबाई बालाजी माने या दोघा पती-पत्नीचा दरम्यान प्रथम मृत्यू झाला झाला होता यांच्या मृत्यूच्या घटनेने गावावर व परिसरावर शोककळा पसरली होती.

दिनांक 18 सप्टेंबर रोजी सव्वाचार वाजता दोघेही पती-पत्नीवर एकाच सरणावर अंत्य विधी करण्यात आला होता.दिनांक 18 सप्टेंबर रोजी त्यांची आई वत्सलाबाई भीमराव माने यांचाही उपचारात दरम्यान मृत्यू झाला होता त्यांच्याही प्रेतालामोठ्या जड अंतकरणाने गावकऱ्यांनी व असंख्य नागरिकांनी नातेवाईकानीअंत्यविधी करण्यात आला होता.

आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी मुंबई येथील जे जे हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान गजानन बालाजी माने हा जखमी पैकी चौथा व्यक्ती मृत झाला असून दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या आमच्या प्रतिनिधीला भ्रमणध्वनीवरून माहिती दिली आहे. घटनेतील उर्वरित एका जखमी व्यक्तीवर मुंबई येथील जे जे रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!