नांदेड| बॅक ऑफ महाराष्ट्राचे कर्तव्यनिष्ठ कर्मचारी रोखपाल सुरेश गजभारे हे ३९ वर्षे सेवा करुन सेवानिवृत्त झाल्याने त्यांना सहकारी अधिकारी, कर्मचारी व मित्रपरिवाराच्या वतीने एक शानदार सेवानिवृत्ती सोहळा घेऊन भव्य सत्कार करुन निरोप देण्यात आला आहे.

सुरेश गजभारे हे सामाजिक व कौटुंबिक व सहकारी यांच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी असणारे वं भारतीय बोध्द महासभा,समता सैनिक दलाचे नांदेडचे कमांडंर म्हणून उल्लेखनीय कार्य आहे.अनेक युवकांना शिक्षण व व्यवसाय उभे करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे.

असे सामाजिक योगदान व त्यांची ३९ वर्षे बॅंकेचे कर्मचारी म्हणून सेवा केली याकाळात त्यांचा वक्तशीरपणा व सर्वांशी विनयशील व्यवहार असल्याने सर्वांच्या आपुलकीचे व्यक्तिमत्त्व होते.सहकारी व चाहाते व परिवाराच्या वतीने सेवापुर्ती भव्य असा सन्मान सोहळा घेण्यात आला यावेळी अधिकारी कर्मचारी व मित्रांनी त्यांचा सत्कार करुन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य व्यवस्थापक मोहम्मद युसुफ निष्शां त कुमार पंकज अढाव मुंकुद इनामदार स्वाती पालीमकर आर्पना मुखेडकर बि. सुरजानी रमन संनगम कर टी. प्रदीप प्रसाद सुर्यवंशी रियाज कसार प्रमोद डुमणे विनोद सबनीस पल्लवी हाके पढाणसर विनोद तलवारे अहिल्या मुरली गजभारे उषा गजभारे दिपा वाघमारेहोते तर सुत्रसंचलन व आभार पंकज आढाव यांनी केले .
