सिडको हडको परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळेत पहिल्या दिवशी विधार्थी स्वागत व मोफत पाठयपुस्तके वाटप
नवीन नांदेडl सिडको हडको परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील १ ते ७ वर्गातील विधार्थी यांना मोफत पाठयपुस्तके वाटप करण्यात आली तर पहिल्या वर्गातील नव्याने प्रवेश घेतेलेल्या विधार्थीचे स्वागत करण्यात आले,शाळा प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी काढून व सुस्वागतम करून विधार्थी व पालकाचे स्वागत करण्यात आले.
सिडको हडको परिसरातील १५ जुन पासून प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुरूवात झाली,शाळेचा वतीने प्रवेशद्वार येथे आकर्षक रांगोळी काढून विधार्थी यांच्ये स्वागत करण्यात आले तर पहिल्या वर्गात नव्याने प्रवेश करणाया विधार्थी यांच्या स्वागत करण्यात आले,नरसिंह विघामंदीर प्राथमिक शाळेत १ ते ४ वर्गातील विधार्थी यांना मोफत पाठय पुस्तके नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर,पत्रकार तिरूपती पाटील घोगरे, मुख्याध्यापक श्रीमती एंकुडवार व्ही.ए,श्रीमंती संगेवार एस.आर, पोहरे, व्हि. एन,श्रीमती वाडीकर पि.के,झाडे एल.बी,क्षिरसागर जि. बी. चौलवाड, एम.बी,कोनापुरे डि.व्ही,बसवदे ,जि.टी.श्रीमती वाघमारे एम व्हि.यादव के.व्ही,सिंगणवाड व्ही.व्ही.व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती, तर कसुमताई विद्यालय सिडको येथे मुख्याध्यापिका सौ.शशिकला ताई जाधव बिरादार सचिव संभाजी बिराजदार, शेख निजाम गवंडगावकर, सौ.उजवला चाफे ,यांनी विध्यार्थी यांचे चॉकलेट व पुष्प देऊन स्वागत केले तर विधानिकेतन माध्यमिक शाळा येथे मुख्याध्यापक विनया बेताळे, प्राथमिक मुख्याध्यापक बी. के. मटकंमवाड,शिक्षक चिद्रावर हिवराळे, संजय काचावार एरमलवाड ,स्वामी यांनी विद्यार्थ्याचे स्वागत पुष्प देऊन केले, व मोफत पाठय पुस्तके वाटप केली, कौठा येथील नरहर कुरुंदकर शाळेत मुख्याध्यापक संजय पांडे ,
सहसचिव डॉ.जगदीश गदेवार यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व मोफत पुस्तक वाटप करण्यात आले.
महात्मा गांधी प्राथमिक सिडको येथे मुख्याध्यापक कानवटे एस. एच,व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर यांनी शाळेच्या वतीने नव्याने पहिलीच्या वर्गातील विध्यार्थी यांना शाळेच्या वतीने गणवेश व दप्तर व मोफत पाठयपुस्तके दिले तर काकांडी येथील शिवशक्ती माध्यमिक विद्यालय येथे सचिव लक्ष्मण खेमा जाधव,मुख्याध्यापक विपीन लक्ष्मण जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख कोल्हे ,बी.आर ,व गावातील व परिसरातील प्रतिष्ठीत मंडळी यांच्या हस्ते मोफत पाठयपुस्तके करण्यात आले,व विद्यार्थी स्वागत करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवस असल्याने प्राथमिक व माध्यमिक शाळेनी साफ सफाई,पिण्याचे पाणी या सह परिसरातील मैदान सुसज्ज केले होते तर प्रवेशद्वार येथे आकर्षक रांगोळी काढून सजावट केली होती.