नांदेड| महाराष्ट राज्य भारत स्काऊटस आणि गाईडस यांच्या विद्यमाने नांदेड भारत स्काऊटस आणि गाईडस तथा शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या द्वारे दिनांक 11.10.2023 ते 17.10.2023 या कालावधीत नांदेड भारत स्काऊटस आणि गाईडस जिल्हा कार्यालय, वजीराबाद नांदेड येथे स्काऊट प्राथमिक प्रशिक्षण व प्रगत प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हयातील स्काऊटर आणि गाईडर यांनी जिल्हा स्तरावर राज्यस्तरीय स्काऊट मास्टर प्राथमिक प्रशिक्षण व प्रगत प्रशिक्षण शिबीर लावण्याकरीता जिल्हा कार्यालयास विनंती केली होती. त्यानुसार महाराष्ट राज्य भारत स्काऊटस आणि गाईडस यांच्या विद्यमाने नांदेड भारत स्काऊटस आणि गाईडस तथा शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या द्वारे दिनांक 11.10.2023 ते 17.10.2023 या कालावधीत नांदेड भारत स्काऊटस आणि गाईडस जिल्हा कार्यालय, वजीराबाद नांदेड येथे स्काऊट प्राथमिक प्रशिक्षण व प्रगत प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी ज्यांचे प्राथमिक प्रशिक्षण पुर्ण झाले असेल त्यांनी प्रगत प्रशिक्षणाला सहभाग घेऊ शकतात.
तसेच प्राथमिक प्रशिक्षण वर्ग 5 ते 10 वी च्या शिक्षकानी घेणे आवश्यक असुन सदर प्रशिक्षणास जिल्हयातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळेतील जास्तीत जास्त शिक्षकांनी या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्याचे आव्हाण मा.जिल्हा मुख्य आयुक्त श्रीमती सविता बिरगे शिक्षणाधिकारी (प्राथमिक),जिल्हा परिषद, नांदेड, जिल्हा आयुक्त (स्का) श्री प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक)जिल्हा परिषद, नांदेड, श्री. जनार्दन इरले जिल्हा संघटक (स्का), श्रीमती शिवकाशी तांडे जिल्हा संघटक (गा) यांनी केले आहे.