नांदेड| महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आयोजित ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा नांदेड केंद्रावर दिनांक २१ नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत, कुसुम सभागृह नांदेड येथे रोज सायंकाळी ७:०० या वेळेत संपन्न होणार आहे. या स्पर्धेत नांदेड आणि परभणी अश्या दोन जिल्ह्यातून ऐकून १२ नाट्य प्रयोग सादर होणार असून त्यानंतर ४ डिसेंबर पासून नांदेडशी सलग्न असलेले लातूर येथील उप-केंद्रावर १२ नाट्य प्रयोग सादर होणार आहेत.
नांदेड केंद्रावर मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा नांदेडच्या वतीने वसंत कानेटकर लिखित, मीनाक्षी पाटील दिग्दर्शित “रायगडाला जेंव्हा जाग येते” या नाट्य प्रयोगाने शुभारंभ होणार आहे तर बुधवार २२ नोव्हेंबर रोजी आंबेडकरवादी मंच, नांदेडच्या वतीने वीरेंद्र गणवीर लिखित, राहुल जोंधळे दिग्दर्शित “गटार”, गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी छत्रपती सेवाभावी संस्था, परभणीच्या वतीने अतुल साळवे लिखित, दिनेश कदम दिग्दर्शित “वाडा”, शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी कल्चरल असोसिएशन, नांदेडच्या वतीने अशोक बुरबुरे लिखित, डॉ. विजयकुमार माहुरे दिग्दर्शित “मयतीम्होर्ल आग्टं”, शनिवार २५ नोव्हेंबर रोजी देऊबाई शिक्षण संस्था,
नांदेडच्या वतीने डॉ. सतीश साळुंके लिखित, डॉ. राम चव्हाण दिग्दर्शित “महात्मा कांबळे” रविवार २६ नोव्हेंबर रोजी क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट, परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, विजय करभाजन दिग्दर्शित “गंमत असते नात्यांची”, सोमवार २७ नोव्हेंबर रोजी सिद्ध नागार्जुना मेडिकल असोसिएशन, नांदेडच्या वतीने इरफान मुजावर दिग्दर्शित, माधुरी लोकरे दिग्दर्शित “नेकी”, मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविध्यालय, नांदेडच्या वतीने सुरेश खरे लिखित,
डॉ. मनीष देशपांडे दिग्दर्शित “मंतरलेली चैत्रवेल”, बुधवार २९ नोव्हेबर रोजी राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्या वतीने अतुल साळवे लिखित, दिग्दर्शित “दि अनॉनिमस”, गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी बालगंधर्व सांस्कृतिक कला, क्रीडा व युवक मंडळ, परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, सुनील ढवळे दिग्दर्शित “खंडहर”, शुक्रवार ०१ डिसेंबर रोजी तन्मय ग्रुप, नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, दिग्दर्शित “कथा मुक्तीच्या व्यथा मातीच्या” आणि शनिवार 2 डिसेंबर रोजी झपूर्झा सोशल फाउंडेशन, परभणीच्या वतीने विनोद डावरे, लिखित, ऐश्वर्या डावरे दिग्दर्शित “चिरंजीवी” या नाट्य प्रयोगांचे सादरीकरण होणार आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा संपन्न होणार असल्याचे विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचलनालय यांनी नमूद केले. दर वर्षी जल्लोषात संपन्न होणार्या, रंगकर्मींचा सोहळा समजल्या जाणार्या या स्पर्धेस नेहमीच नांदेडकर रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. याही वर्षी संपन्न होणार्या या स्पर्धेस जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहून कलावंताना प्रोत्साहन द्यावे असे आव्हान करण्यात आले आहे.