अयोध्या रामल्ला प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको भव्यआमंत्रण शोभायात्रा ऊत्साहात, ठिकठिकाणी पुष्पवृष्टी

नवीन नांदेड। सिडको हनुमान जन्मोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित भव्य शोभायात्रा राम मंदीर हडको ते दक्षिण हनुमान काळा मुखीं हनुमान मंदिर संभाजी चौक सिडको काढण्यात आलेल्या या यात्रेत मोठया प्रमाणात महिला ,युवक, जेषठ नागरीक यांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती तर अनेक ठिकाणी मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी तर भव्य स्वागत करून महिलांनी रांगोळी व आरती करून या शोभायात्रेचे स्वागत केले, प्रारंभ हडको येथे भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुतरे यांच्या हस्ते तर खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते समारोप करण्यात आला.
समस्त हिंदुत्वाची सर्वोच्च अस्मिता असलेल्या प्रभू श्रीराम जन्मभूमीतील मंदिराचं स्वप्न काहीच दिवसात पूर्णत्वास येत आहे. या मंगलमयी पर्वाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर अक्षता वाटप अभियान सुरु आहे येत्या 22:जानेवारी रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामल्लाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना अयोध्या येथे होणार आहे. जिल्ह्याभरात विविध ठिकाणी अक्षदा चे कळश यात्रा,काढून त्याचे स्वागत हिंदु बांधवान कढून होतं आहे त्या पाश्वभूमीवर सिडको मध्ये श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको च्या वतीने १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता श्री राम मंदिर रविवार बाजार येथे हनुमान चालीसा पठण व आरती करून भव्य आमंत्रण शोभायात्रा चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रभु श्रीराम उत्सव मुर्ती , राम लक्ष्मण सिता व हनुमान यांच्या देखावा व अश्व असलेला रथ या मिरवणुकीत सहभाग होता, प्रारंभी हडको येथुन महाआरती भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते देविदास राठोड, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, भाजपा नगरसेविका सो. बेबी ताई गुपीले, भाजपा उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख,माजी नगरसेवक राजु गोरे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महानगर जिल्हा अध्यक्ष नवनाथ कांबळे, संतोष वर्मा,जनार्धन ठाकूर,धिरज स्वामी, मोहन घोगरे किशोर देशमुख शिवसेनेचे ब्रिज लाल उगवे, निकिता शहापुरवाड,विश्व हिंदू परिषद,बजरंग दल, भाजपा पदाधिकारी, महिला व समस्त सकल हिंदू समाज यांच्या उपस्थितीत करण्यात आली, यावेळी बंडा रवंदे प्रस्तुत स्वरचछंद प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध गिताचे तर असदवन येथील भजनी मंडळ, सिडको हडको परिसरातील महिला भजनी मंडळ यांच्या सहभाग होता.
हडको छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा ते इंदिरा गांधीं हायस्कूल हडको, ज्ञानेश्वर नगर, अण्णा भाऊ साठे पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक सिडको, क्रांती चौक, राज चौक, संभाजी चौक दरम्यान विविध ठिकाणी पुष्पवृष्टी तर महिलांनी उत्सव मुर्ती चे विधीवत पुजन केले तर विविध प्रतिष्ठाण यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी, व सहभागी भाविकांना चहा, फराळ, पाणी व्यवस्था केली होती.या मिरवणुकीत सिडको हडको भागातील विविध मंदिरातील पुजारी सहभागी झाले होते, तर लेझीम पथकाने विविध कलाकृती सादर केली, तर महिलांनी युवकांनी जयश्री राम यांच्या वर आधारित प्रसिद्ध असलेल्या गितावर नृत्य केले.
शोभायात्रे निमित्ताने सिडको हडको परिसरात भगवे ध्वज व पताके लावण्यात आले होते, समारोप सिडको येथील दक्षिण मुखी हनुमान काळा मंदिर येथे भव्य आरती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व माजी भाजपा महानगर अध्यक्ष प्रविण साले, चैतन्य बापू देशमुख, बाळु खोमणे, व उपस्थित भाविक भक्तांचा उपस्थित करण्यात आला, यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आयलाने व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, उपनिरीक्षक माणिकराव हंबर्डे व पोलीस अंमलदार, पोलीस कर्मचारी यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
आयोजक श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको हडको एव सकल हिंदु समाज यांच्या तर्फे मयुर वर्मा,गणेश चंदेल यांनी सहभागी भाविक भक्ताचे आभार व्यक्त करून २२ जानेवारी रोजी मोठया प्रमाणात राम प्रतिष्ठापना मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
