कलंबर ( बु.) येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उस्माननगर। मराठवाड्यासह पंचक्रोशीतील परिचय ( ओळख) असलेल्या कलंबर बु .लोहा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री संत अगडम बुवा यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदातांनी रक्तदान हेच श्रेष्ठ दान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
कलंबर बुद्रुक तालुका लोहा येथील श्री संत अगडंमबुवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कलंबर बुद्रुक यांच्या व गुरुगोविंदसिंगजी ब्लड बँक सेंटर नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सदरील शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे तेरावे वर्ष या शिबिराचे असून ‘ जनसेवा हीच ईश्वर सेवा” समजून भविष्यात गरज भासणाऱ्या रक्तांसाठी किती भटकंती करावी लागते , याचे उदाहरण समाजासमोर उभे राहते.समाजामध्ये इतर लोक अनेक प्रकारचे दान करीत असतात मात्र “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान ” समजून भविष्यात कोणाचे तरी प्राण वाचवू शकतो .या पवित्र भावनेने स्वयंस्पृतिने येथील तरुण मंडळीने श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षक व्यंकटी तुपेकर गुरुजी व शिवराज स्वामी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी गावातील सरपंच , उपसरपंच ,चेअरमन, पोलीस पाटील ,पदाधिकारी उपस्थित होते.दिवसभर तरुण मित्र परिवाराने रक्तदान शिबिरात जवळपास 75 च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान करून पवित्र कार्यात सहभाग नोंदविला. यावेळी श्री गुरुगोविंद सिंग जी ब्लड बँक सेंटर नांदेड चे मॅनेजर दिलीप सोनटक्के ,प्रविण दंडे ,किरण राठोड , कपिल वाढवे , बजरंग यांनी रक्तदात्यांना सहकार्य केले. आयोजित रक्तदान शिबिरात यशस्वी करण्यासाठी संतोष कंकरे ,मोहन गांजेवार ,सुशिल कुमार मुक्कनवार ,रूपेश ठाकुर ,प्रविण कच्छवा , बालाजी सौराते , नामदेव तारु , विवेक तेलंगे , यांच्यासह यात्रा कमिटीचे पदाधिकारी आणि संस्थेचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.