श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| अवैध मटका व अवैध व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे.माञ सिंदखेड पोलिसातील काही हप्तेखोर कर्मचार्याच्या कारवाई शून्य नियोजनामुळे वरीष्ठ स्तराहून वारंवार होणारी कारवाई फोल ठरत आहे. सूत्राने दिलेल्या माहितीवरुण पोलीस ठोस पाऊले उचलत नसल्याने माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील अवैध मटका चालक व गांजा तस्कर समदभाईच्या मुसक्या आवळण्यासाठी सिंदखेड पोलिसांना अपयश येत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतं आहे.
सिंदखेड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या वाई बाजार येथे बेकायदा मटका व अवैध गांजा व्यावसायिकांचे प्रमाण फोफावत असल्याने अवैध व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.अशातच माहूर तालुक्यात मटका किंग म्हणून परिचीत असलेला समदभाई हा खुल्लम खुल्ला स्वतंत्रपणे येथे मटका जुगार चालवत आहेत.ऐवढेच नाही तर त्याने आता गांजा व्यवसाय हि सुरु केल्याची खाञीलायक माहिती समोर येत आहे.हा व्यवसाय येथील छञपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या थाटला चालविण्यात येत असल्याने या भागात मटका लावणार्याची व गांजा घेणार्याची मोठी गर्दी होत आहे.त्यातच जि.प शाळा हि हकेच्या अंतरावर असल्याने यांचा परिणाम येथील विध्यार्थ्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सिंदखेड पोलीसांनी किमान विध्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करुण समद भाईवर कार्यवाही करुण त्याला हद्दपार करावे, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
येथील मटका व गांजा माफिया समदभाई यांचा व्यवसाय सुरळीत चालावा म्हणून पोलीस यंत्रणेतील काही पोलीसांशी “अर्थपूर्ण” पद्धतीने सोबत घेऊन चालत असल्याने समदभाईचा मटका-जुगार, गांजा व्यवसाय तेजीने व बेधडक सुरु असल्याचे लोकांमध्ये खुलेआम चर्चिले जात आहे. तर सिंदखेड पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांचेकडून यावर अंकुश लावण्यात येऊन मोहात गुंतलेल्या सामान्य नागरिकांना मटका व गांजा यातून दिलासा मिळावा अशी सुज्ञ नागरिक अपेक्षा बाळगून आहेत.