श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा शिवशक्तीनगर येथील सोन्या मारुती मंदिरात मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आला
नांदेड। श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा शिवशक्तीनगर येथील सोन्या मारुती मंदिरात मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आला असून प्रत्येक घरासमोर विद्युत रोषणाई, पुष्पहाराची सजावट, भगवे पताके, श्रीरामाचे प्रतिमा असलेले झेंडे, आकर्षक रांगोळ्या, फटाक्याची आतिषबाजी करत राम भक्तांनी जगातील सर्वात मोठ्या सोहळ्याचा आनंद लुटत दिवाळी साजरी केली.
नांदेड येथील मिल रोड भागात प्राणप्रतिष्ठा सप्ताहाची सुरुवात स्वच्छता अभियानाने झाली. आयोध्या येथून आलेल्या अक्षदांचे वाटप कलश यात्रा काढून देण्यात आले.
रामेश्वर येथील राम शीला पूजन करण्यात आले.दररोज संध्याकाळी भजन, सामूहिक हनुमान चालीसा व महाआरती करण्यात आली. प्राणप्रतिष्ठा पूर्वसंध्येला प्रत्येक घरासमोर रांगोळी , तसेच किमान ११ दिवे, आणि घरावर भगवे झेंडे तथा विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
भगवान श्रीरामा ची भव्य मूर्तीची मिरवणूक काढून सोन्या मारुती मंदिरात करण्यात आली.मिल रोड भागातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यामध्ये ३६ महिलांनी सहभाग घेतला होता.सौ. चंदना विनय भंडारी व सौ. नमिता भंडारी यांनी प्रत्येक घराला भेट देऊन यशस्वी स्पर्धकाची निवड केली. अयोध्या येथे नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. दुपारी एक वाजता महाआरती झाल्यानंतर शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.रात्री शशिकांत भुसेवाड मित्र मंडळातर्फे नामांकित वाद्यवृंदांनी सादर केलेल्या भजनसंध्येत उपस्थित शेकडो रसिक मंत्रमुग्ध झाले.
प्राणप्रतिष्ठा सप्ताहामध्ये धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर, शशिकांत भुसेवाड, नरसिंगराव कहाळेकर, धीरज यादव, राहुल भुसेवाड,राजेश यादव ,ॲड.करण जाधव, बालाजी सिद्धनाथ, रेखा नगारे, महादु लुटे, बिरबल यादव, गजानन मारावार, नितेश अग्रवाल,कपिल यादव, अशोक शिंदे, अशोक साखरे,नथूलाल यादव,गोविंद पाळवेकर, नंदलाल यादव, संतोष भारती, नारायण पाळवेकर, शक्ती साखरे, नर्सिंग द्रौपदीवार,रोहन यादव ,कालिंदी कहाळेकर, अनिता यादव ,रेखा नगारे, विमल भारती, हिरुताई भंडारे, नारायण पालवेकर, रामराव राऊत महाराज, नरसिंह यादव,विमल रूमने,निर्मला यादव, पल्लवी,लक्ष्मीबाई गुटाळ, ममता यादव, संगीता यादव, निर्मला भोसले, सुनिता यादव, मीनाक्षी नगनुरवार,हेमलता यादव, लक्ष्मीबाई द्रोपदीवार, फुलाबाई भोसले,पार्वती यादव, कांचन यादव,शितल यादव, गणेश मॅकलवार, जमनाताई मुदिराज, मंगलताई, सोनू गुटाळ, अशोक कापतवार, बालाजी बेजमवार, गोपाळ रापतवार, सोहन यादव, दिपकसिंह ठाकूर, गणेश मेहता, सुरेश यादव,दिपक गुप्ता, अनिल भोसले, कृष्णा इंगळे, अभिजित पाटील,राजेश जोनपल्ली,प्राची टापरे,मनीषा यादव, गोविंद पालवेकर,किशोर ठाकूर,अमर यादव,मयुरी यादव,आराध्या यादव,अनोखी यादव,साक्षी टापरे, जगन्नाथ यादव,कविता यादव, ॲड.रंजीत कहाळेकर,चंदु द्रौपदीवार, किशोर लोंढे, अभिजीत लोखंडे, चंद्रशेखर मगिरवार त्यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.