नवीन नांदेड| भारतीय प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त सिडको शिवाजी महाविद्यालय वतीने काढण्यात आलेल्या प्रभातफेरीने सिडको हडको वासिंयाचे लक्ष वेधले, या प्रभातफेरी मध्ये टिपरी, वारकरी वेषभूषा, यांच्या सह अनेक विविध भूमिका साकारलेल्या होत्या, रस्तयाचा दुतर्फा महिला युवक नागरीकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.
शाळा महाविद्यालयांमध्ये २६ जानेवारी या दिवसाची विद्यार्थी शिक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. याचाच एक भाग म्हणून जनता शिक्षण प्रसारक मंडळ ता. मुखेड जि. नांदेड संचलित शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नवीन नांदेड येथे प्रजासत्ताक दिनाची प्रभात फेरी आज मोठ्या उत्साहात काढून सिडको हडको वासीयांचे लक्ष वेधून घेतल्यामुळे सर्वत्र कौतुकाचा विषय झाला आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष रवी शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्रा.साहेबराव देवरे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले पर्यवेक्षक व्ही .एस .पाटील,वरीष्ठ लिपिक व्ही.एस.वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
त्यानंतर प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली प्रभात फेरी ही पाण्याची टाकी गुरुवार बाजार शिवमंदिर मार्गे विद्यालयांमध्ये समारोप करण्यात आला या प्रभात फेरी दरम्यान लेझीम पथक,टिपऱ्या पथक, डंबेल पथक,वृक्षदिंडी,स्काऊट गाईड पथक, एनसीसी पथक तसेच वारकरी वेशभूषेतील विद्यार्थी, विविध महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, विविध प्रकारचे कलागुण गुण दर्शवणारे विद्यार्थी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाँकी या प्रभात फेरीदरम्यान प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. इत्यादींनी आपले कलागुण सादर करीत ही प्रभात फेरी समोर चाललेली होती. याप्रसंगी सिडको हडकोतील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून सदरील प्रभात फेरीकडे मोठ्या कौतुकाने पहात होते. या प्रभात फेरीची सांगता विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना अल्पोहार देऊन करण्यात आली, या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आयोजन शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यालयाचे प्रशासन यांच्यावतीने करण्यात आलेले होते.