लोहा| छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुना लोहा येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अभिषेक जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर ढोल ताशांचा गजर….आतिषबाजी ..टाळ मृदंगासह छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्याने निघाली.जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मिरवणुकीची सुरुवात केली. जयंती सोहळ्यात मोठ्या प्रमाणात शहर व तालुक्यातील सर्व जातीधर्माचे शिवभक्त सहभागी झाले होते
दरवर्षी प्रमाणे यंदाही लोहा शहरात युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते .यंदाही शहर भगवेमय झाले आहे .१९ फेब्रुवारी सोमवारी दुपारी जुन्या शहरातील शिवरायांच्या पुतळ्याचा अभिषेक जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, युवा नेते प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील यांनी मिरवणुकीच्या रथावर ठेवलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्या नंतर जुन्या शहरातुन वाजतगाजत भव्य मिरवणूक निघाली . मिरवणुकीत प्रसिद्ध बँड, टाळ -मृदंग, ढोल ताशासह आतिषबाजी होती.
युवा नेते सचिन पाटील चिखलीकर, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी सभापती आनंदराव पाटील, माजी जि प सदस्य गणेशराव सावळे, माजी उपनगराध्यक्ष दता वाले, माजी नगरसेवक करीम शेख बालाजी खिल्लारे, प्रा डॉ डी एम पवार,नारायण येलरवाड , माजी सभापती अप्पराव पवार माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, माजी सदस्य गणेश उबाळे, केरबा पाटील अंकुश कदम, विनायक काळे, आयोजक भास्कर पवार, सचिन मुकदम, रथ सजावट करणारे अनिल धुतमल, दीपक कानवटे, सुरेश गायकवाड पार्डीकर, माजी सरपंच संभाजी पवार पार्डीकर, बंडू वडजे, पहेलवान मिरकुटे, प्रवीण धुतमल, नामदेव काका पवार,जयंती मंडळाचे अध्यक्ष नारायण पवार, गोवर्धन पवार, केशव पवार,वीरभद्र राजूरे, इमाम लदाफ, कल्याणकर, यासह जयंती मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते . शहरातून व आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या संख्येने शिवभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते रात्री आकर्षक आतिषबाजी होती. प्रवीण पाटील चिखलीकर व सहकाऱ्यांनी यंदाही मोठ्या परिश्रमाने शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा केला.