नवीन नांदेड। जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी ईतवारा यांच्या अधिपत्याखाली ग्रामीण व ईतवारा हद्दीत २४ डिसेंबर रोजी सकाळी गोवंशीय जातीचे बैल गाय यांच्यी तस्करी व कतल करणाऱ्या लोकांविरुद्ध छापे टाकून कार्यवाही करत सात आरोपींना अटक करून २२ लक्ष रूपयाचा मुदेमाल जप्त,एक ट्रक, एक टेम्पो, व गोमांस जप्त केला असून या कार्यवाही मुळे खळबळ उडाली आहे.
श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी उप विभागीय पोलीस अधिकारी इतवारा, सुशिलकुमार नायक यांना उपविभाग इतवारा, हद्यीत पोलीस स्टेशन इतवारा व नांदेड ग्रामीण हद्यीत गोवंशीय जातीचे बैल, गाय यांची तस्करी व कत्तल करणा-या विरूध्द छापे टाकुन कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने उप विभागीय पोलीस अधिकारी इतवारा सुशिलकुमार नायक यांनी उपविभाग इतवारा, अंतर्गत पोलीस स्टेशन इतवारा व नांदेड ग्रामीण पोलीस अधिकारी व अंमलदार, डी.बी.पथक, पो.स्टे. नांदेड ग्रामीणचे पोलीस अधिकारी, अंमलदार असे वेगवेगळे पथक तयार करून आज दिनांक 24.12.2023 रोजी सकाळी 05.00 ते 10.00 वा पावेतो पो.स्टे. इतवारा व पो.स्टे. नांदेड ग्रामीण हद्यीत ठिक-ठिकाणी छापे मारून पो.स्टे. इतवारा नांदेड येथे एकुण 03 गुन्हे व पो.स्टे. नांदेड ग्रामीण अंतर्गत 01 गुन्हा असे एकुण 04 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नमूद 4 गुन्हयात 15 आरोपी निष्पन्न झाले असुन त्यातील 7 आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयामध्ये एकुण 13 गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका करून गोशाळा येथे दाखल करण्यात आले आहे ,तसेच आरोपीतां कडुन एक ट्रक, एक टाटा AES टेम्पो व गोवंश जातीचे मांस असा एकुण 22,00000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक, नांदेड, अविनाश कुमार अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शना खाली मा. उप विभागीय पोलीस अधिकारी इतवारा, सुशिलकुमार नायक उपविभाग इतवारा, यांचे नेतृत्वात पो.नि.संतोष तांबे, सपोनि आनलदास, सपोनि श्रीधर जगताप, पोउपनि महेश कोरे, पोउपानि गायकवाड, पोहेकॉ वाजीद, पोना मिलींद नरबाग, डी.बी. पथकाचे अंमलदार पोहेकॉ मोकले, पोहेकॉ हाके, पोना चाऊस, पोना. दासरवार, पोकॉ कोरनुळे, पोकॉ माने, पोकॉ गायकवाड, पोकॉ देशमुख, पो.स्टे. नांदेड ग्रामीणचे पोहेका वाकडे, पोहेका मलदोडे, पोहेका मुंडे,पोकॉ स्वामी,जाधव, बेलुरोड, दासरे, कलंदर, सत्तार शेख, दिगांबर मुसळे, उमर शेख ,अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.घटनास्थळी नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शेख रईसौधदीन यांनी पंचनामा केला आहे.या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.