रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी के. नागभुषण यांचा हिमायतनगर तालूका पत्रकार संघाच्या वतीने निषेध
हिमायतनगर। नांदेड हिमायतनगर रेल्वे स्थानकावर अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत रोड ओव्हर ब्रिज अंडर पासचे समर्पन भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ काॅन्सफरच्या माध्यमातून पार पडले. या कार्यक्रमादरम्यान शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते.
या कार्यक्रमात स्थानिकचे मुख्य आयोजक रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी के नागभुषण यांनी उपस्थित पत्रकाराचा सन्मान तर सोडाच त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देवून अपमानीत केले. या घटनेचा हिमायतनगर तालूका पत्रकार संघाच्या वतीने तिव्र निषेध नोंदविण्यात आला असून, दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. अशा आशयाचे निवेदन रेल्वे विभागाला पत्रकारांच्या वतीने सादर करण्यात आले आहे.
निवेदनावर मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक प्रकाश जैन, डिजीटल मिडीयाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल मादसवार, तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ताभाऊ शिराणे, गोविंद गोडसेलवार, मनोज पाटील, शुद्धोधन हनवते, धोंडोपंत बनसोडे, आनंद जळपते, सय्यद मनान स. अब्दूल, गंगाधर गायकवाड, विजय वाठोरे, असद मौलाना, आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.