उस्माननगर। ६३ वे महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन (विद्यार्थी विभाग) ठाणे येथे दिनांक २४ ते ३० जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित होत आहे. त्या प्रर्शनात अभिनव चित्रशाळा कला शिक्षण संस्था संचालित, कलामहषौ त्र्यंबक वसेकर चित्रकला महाविद्यालयातील अंटीडी प्रथम वर्षातील विद्यार्थी सोनसळे सिध्दोधन शिवाजी याचे ऑब्जेक्ट ड्रॉइंग चित्र प्रदर्शित झाले आहे.
या प्रदर्शनासाठी राज्यभरातील शासकिय व अशासकिय अनुदानित व विनाअनुदानित कला महाविद्यालयातुन जवळपास अडीचशे पेक्षा अधिक कला महाविद्यालयातील विद्याथ्यांनी ऑनलाईन पध्दतिने कलाकृत्या सादर करण्यात आलेल्या होत्या.
यात फांऊंडेशन कोर्स ओटीडी कोर्स, जीडीआर्ट, शिल्पकला, इंटिरिअर डेकोरेशन, टेक्सटाईल, सिरॅमिक आर्टमधून सर्व नियम अटीनुसार या स्पर्धेसाठी कलाकृती मागवल्या होत्या. यातुन शासनाने नेमलेल्या समितीने उत्कृष्ट कलाकृतीची निवड केली त्यात अंटीडी विभागात सोनसळे सिध्दोधन शिवाजी याच्या ऑब्जेक्ट ड्रॉइंग या चित्राची निवड केलेली आहे.
या यशाबद्दल सिध्दोधन चे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डी.व्ही. फुलारीसर, कार्यवाह के.डी.जोशीसर कोषाध्यक्ष श्री. संजय देशपांडे, सदस्य श्री मधकर कुरूडेसर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. रविंद्र कांबळे, प्रा. श्री आरदवाड यांनी केले आहे.