नांदेड। नावामनपाचे आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतून दरमहा ऑफीसर ऑफ द मन्थ साठी सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक ,व एम्ल्पाॅयी ऑफ द मन्थ साठी वसंतराव जोशी कर्मचारी निवड करण्यात आली.
दरमहा एक अधिकारी व एक कर्मचारी उलेखनीय कार्य करणाऱ्यांची निवड एका नियुक्त समिती मार्फत करण्यात येते ,यात तिसऱ्या माहे सप्टेंबर २०२३ साठी महानगरपालिकेचे सहा.आयुक्त (स्वच्छता) गुलाम मो. सादेख यांची तिस-या महिन्यांसाठी ऑफीसर ऑफ द मन्थ साठी त्यांनी प्लास्टिक बंदी यशस्वीपणे राबवून मोठ्या प्रमाणात दंड वसुल केला, श्री गणेश विसर्जना निमित्त उत्कृष्ट नियोजन तसेच पर्यावरणपुरक कृत्रिम तलावात लहान व मध्यम आकाराचे ३२४१६ मुर्ती तसेच दोन खदानीत मोठ्या श्री मुर्तीचे विसर्जन करून पर्यावरण पुरक गणेशोत्सवात महत्वाची भुमिका पार पाडली ,तसेच पाणीपुरवठा विभागातील लिपीक अनिल वसंतराव जोशी यांनी अनाधिकृत नळ जोडणी अधिकृत करण्यासाठी नियोजन केले व मनपाच्या उत्पन्नात वाढ केली म्हणुन तिसरा मन्थ ऑफ द एम्प्लाॅयी म्हणुन निवड करण्यात आली.
आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपायुक्त (स्वच्छता)निलेश सुंकेवार,उपायुक्त (प्रशासन) कारभारी दिवेकर, उपायुक्त (कर व महसुल) डॉ.पंजाब खानसोळे , मुख्यलेखापरीक्षक टी.एल. भिसे, मुख्यलेखाधिकारी डॉ.जनार्दन पक्वान्ने यांच्यासह विभागप्रमुख ,क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.पुरस्कार मिळाल्याबद्दल सहा.आयुक्त गुलाम मो.सादेख व अनिल जोशी यांचे सर्वानी अभिनंदन केले.