नांदेड| स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत गावे हागणदारीमुक्त ठेवून त्यांना अधिक आदर्श आणि टिकाऊ बनविण्याचा केंद्र व राज्य शासनाचा प्रयत्न सुरू आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आणि ग्रामपातळीवरील जनसहभाग वाढवण्यासाठी सरपंच संवाद हे नाविन्यपूर्ण मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे.

सरपंच संवाद हे अ‍ॅप्लिकेशन केंद्र शासनाच्या वतीने क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपव्‍दारे सरपंच आपल्या गावातील स्वच्छता व ग्रामविकासाचे उपक्रम पोस्ट स्वरूपात शेअर करू शकतात. तसेच इतर गावांतील उत्तम कामांची उदाहरणे पाहता येतात, विषयानुसार संवाद साधता येतो, पाणी व स्वच्छता विषयक बातम्या व यशोगाथा मिळता येतात, तसेच प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्रही प्राप्त करता येते. हा उपक्रम सरपंचांना प्रेरणा देणारा संवादाचे नवे व्यासपीठ असून, ग्रामपातळीवरील सर्वांगीण, शाश्वत आणि लोकसहभागातून होणाऱ्या विकासासाठी उपयुक्त ठरत आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.qci.sarpanchsamvaad&hl=en_IN&pli=1https://apps.apple.com/in/app/sarpanch-samvaad/id6452552802 तरी सर्व सरपंचांनी सदरचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून त्याचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली व जल जीवन मिशनचे प्रकल्‍प संचालक तथा उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version