दक्षिण विधानसभा निवडणुक लढवणार, संजय घोगरे यांच्यी भुमिका स्पष्ट
नवीन नांदेडl आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ग्रामीण व शहरी भागातील मित्र मंडळ व मतदारांचा आग्रहा खातर हि निवडून लढविणार असल्याची भुमिका संजय पाटील घोगरे यांनी १६ जुन रोजी गुरुकृपा मंगल कार्यालय हडको येथे आयोजित संवाद बैठकीत स्पष्ट केली यावेळी उपस्थित जनसमुदयांनी व मित्र मंडळ यांनी संजय पाटील घोगरे आगे बढो हम तुम्हारे साथ हे घोषणा दिल्या.
आगामी होणाऱ्या विधान सभा निवडणुकीसाठी नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातून युवा शक्ती मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष संजय पाटील घोगरे हे ईच्छुक असुन गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघ मध्ये सामाजिक,राजकीय, शैक्षणिक चळवळीत अग्रेसर राहुन वेळोवेळी रक्तदान शिबीर माध्यमातून व शैक्षणिक क्षेत्रात विधार्थी साठी शैक्षणिक साहित्य वाटप करून व सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक कामे केली असल्यामुळे मतदारसंघात ओळख असल्याने मित्र मंडळ व मतदार आग्रहाखातर निवडणूक लढविण्यासाठी संवाद बैठक आयोजन करण्यात आले होते.
या संवाद बैठकीला अशोक पाटील लोंढे,सरपंच कामाजी पाटील कदम,आकाश पाटील येवले,माधव पाटील पावडे
,महादेवी मठपती,योगेश पाटील नंदवनकर,नंदु पाटील वैध,पद्माकर सावंत,सरपंच विलास इंगळे,बबनराव हंबडे
,कामाजी पाटील कोल्हे, गणेश पाटील लिबंटकर, राजु लांडगे,सतिश बसवदे,मोहन पाटील घोगरे,साईनाथ पाटील टरके,त्र्यंबक पाटील हुसेकर, नारायण पाटील कळकेकर,कैलास पाटील पुंड,शंकर सोनटक्के,बजरंग ढवळे,यांच्या सह परिसरा तील शहरी व ग्रामीण भागातील विविध पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी घोगरे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आगामी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ मधुन उमेदवारी महायुती कडून देण्यात यावी यासाठी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजपा प्रदेशाध्यक्ष,जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे करणार असल्याचे भाजपचे पक्ष प्रवक्ते जनार्दन ठाकूर, वैजनाथ देशमुख,महादेवी मठपती,माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी यावेळी सांगितले तर मनपाचे विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे यांनी पक्षाकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला तर उपस्थित अनेकांनी विकास करण्या साठी व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिवस रात्र उपलब्ध असणारे घोगरे यांना कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळल्यास आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहु अशी ग्वाही दिली,सुत्रसंचलन दिगंबर शिंदे यांनी केले.
घोगरे यांनी भाजयुमो पक्षाच्या माजी नांदेड शहर अध्यक्ष व सध्या भाजपा नांदेड शहर सरचिटणीस असुन माझ्या पक्षाकडून उमेदवारी मिळविण्या साठी मि आता पासूनच तयारी केली आहे,माझ्या केलेल्या विकास कामावर व सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या कार्याची दखल घेत मला उमेदवारी मिळेलअशी आशा असल्याचे सांगून मि विधानसभा निवडणुक लढविण्याची तयारी केली आहे,आज या बैठकीत जमलेला जन समुदाय ही भक्कम बाजु असल्याचे सांगितले. बैठक यशस्वी होण्यासाठी युवा शक्ती मित्र मंडळ पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.