संजय गांधी, श्रावण बाळ योजनेतील ३६५ अर्ज मंजूर; पूनमताई पवार यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। येथील तहसील कार्यालात सोमवार दि.२६ फेब्रुवारी रोजी सजंय गांधी योजनेची बैठक योजनेच्या अध्यक्ष्या पुनमताई राजेश पवार व सचिव तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्या उपस्थितीत झाली. यात श्रावण बाळ योजना व संजय गांधी योजनेमधून ३६५ अर्ज मंजूर करण्यात आल्याने तळागाळातील लाभार्थ्यांना न्याय देण्याचे काम या समितीने केल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकार व केंद्र सरकारकडून विधवा व अपंग लाभार्थ्यांना संजय गांधी तर वयोवृद्ध लाभार्थ्यांना श्रावण बाळ योजनतेतुन दर महा १५०० रुपये अनुदान दिले जाते. यासाठी प्रस्ताव तहसील मध्ये दाखल करावा लागतो. पुर्वी तर तीन महीण्याला बैठक होत होती पण नवीन जीआर नुसार दर महीण्याला बैठक होत आहे.
पुनमताई पवार संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा झाल्यापासुन दर महिन्याला नायगाव तहसीलमध्ये बैठक घेऊन जास्ती जास्त प्रस्ताव मंजूर करत लाभार्थ्यांना न्याय देण्याचे काम करीत असल्याने एका बैठकीत ३६५ प्रस्ताव मंजूर झाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. एवढ्या संख्येनी एका बैठकीत प्रस्ताव मंजुर झाल्याची नोंद ब-यांच वर्षांनंतर झाल्याने त्यावरून दिसून येते.
मंगळवारी झालेल्या या बैठकीत जवळपास ४४७ अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी ३६५ अर्ज मंजूर करण्यात आले तर ८२ प्रस्तावात कागदपत्रांची कमतरता असल्याने त्रुटींत काढण्यात आले असुन सबंधित लाभार्थ्यांना त्रुटींवर कळवून प्रस्ताव पुर्ण करून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले .
या बैठकीच्या सचिव तथा तहसीलदार.धम्मप्रिया गायकवाड यांनी नुकताच नायगाव तहसीलचा पदभार घेतले असुन त्यांची ही बैठक पहिलीच होती तहसीलदार गायकवाड यांनी पुनमताई पवार यांचा सत्कार केला समितीचे सदस्य गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी सुर्यवंशी , बी.एम. घोसलवाड, नागेश मेटकर हे उपस्थितीत होते.
तालुक्यातून आलेल्या प्रस्तावाची तपासणी होऊन आलेल्या प्रस्ताव पैकी ३६५ मंजूर झालेल्या नव्या लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या कामासाठी नायब तहसीलदार संजय देवराय,पेशकार लक्ष्मण टेकाळे, अव्वल कारकून कैलास इंगोले आदीनी काम पाहिले .