उस्माननगर, माणिक भिसे| सिध्दार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळा उस्माननगर ता.कंधार येथे दि.२९ डिसेंबर रोजी ज्ञानाबरोबरच व्यवहारांचे ज्ञान समजावे म्हणून आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते. यास पालकांनी, विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन ” आनंदनगरी उत्साव ” उत्साहात पार पडला .
सम्राट अशोक प्राथमिक शाळेत सकाळ पासून शाळेत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल्स ( दुकाने ) लावण्यात आले होते.मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेंत आनंदनगरी चे आयोजन करण्यात आले होते. ” आनंदाची शाळा आमची….. आनंदाची शाळा…. हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हा लागला लळा …” या आनंदात विद्यार्थ्यांनी बनवून आनलेले खानावळीचा आस्वाद मनमुरादपणे घेतला.
विद्यार्थ्याना शाळेत शिक्षणा बरोबरच मैदानावर कवायत , शारीरिक ज्ञान , स्पर्धा परीक्षा , घेण्यात येतात.२१ व्या शतकात विद्यार्थ्यांना शिक्षण महत्त्वाचा घटक बनला आहे.दिवसभर शिकवणी, रात्री होमवर्क (अभ्यास) यामुळे विद्यार्थी अभ्यासात सतत मग्न राहतात. म्हणून विद्यार्थ्यांच्या शरीराना (व्यायाम ) कसरत करायला हवी ., म्हणून शाळेत एक तास पिटी शिकवले जाते.२९ डिसेंबर रोजी अभ्यासाबरोबर व्यवहारांचे ज्ञान असावे म्हणून शाळेत आनंदनगरी घेण्यात आली.यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल्स दुकाने थाटून पालकांना , शिक्षकांना,आपल्याकडे आकर्षित केले होते. विद्यार्थ्यांनी भरपूर असा गल्ला जमा केला होता.शाळेत आनंदनगरी मधील साहीत्य ,खानावळ खरेदी करण्यासाठी झुंबड , गर्दी उडाली होती.यावेळी सहशिक्षक, सहशिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. पालकवृंद ,शिक्षक ,शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांनी “आनंदनगरी” सोहळ्यात लावलेल्या दुकानातील खाद्यपदार्थ घेण्यात मग्न होते.