हिमायतनगर| येथील हुजपा महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला उपस्थितांनी अभिवादन करून त्यांच्या कार्याची गाथा संगितली.
गाडगे महाराज हे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. समाज प्रबोधन करण्यासाठी ते विविध गावांमध्ये भटकत असत. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे ते समाजसुधारक होते. असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या मंचावरुन व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचलन केले. तर आभार सहकार्यक्रमाधिकारी डॉ. लक्ष्मण डोंगरे यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. व्ही. व्ही. कदम, डॉ. दिलीप माने, डॉ. सविता बोंढारे, प्रा. एम. पी. गुंडाळे, डॉ. डी. सी. देशमुख, डॉ. के. बी. पाटील, प्रा. शेरकर, प्रा. विश्वनाथ कदम, प्रा. संदीप निखाते, प्रा. पंडित हाके कार्यालयीन अधीक्षक श्री संदीप हरसुलकर, लिपिक श्री लक्ष्मण कोल्हेवाड, श्री असळकर साहेबराव, श्री विश्राम देशपांडे, श्री राजू डोंगरगावकर, श्री बालाजी चंदापुरे तसेच मस्केताई व नगारेताई आदीसह महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.