नांदेडलाईफस्टाईल
सदाशिव पुरी यांना मातृशोक; माजी नगरसेविका कौशल्याबाई पुरी यांचे निधन
नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सांगवी बुद्रुक प्रभाग क्रमांक तीन च्या माजी नगरसेविका तथा गोपाळ नगर येथील रहिवाशी , ज्येष्ठ नागरिक कौशल्याबाई शंकर पुरी यांचे आज दिनांक सहा रोजी दुपारी सव्वा एक वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समय त्या ८२ वर्षांच्या होत्या.
दिवंगत माजी नगरसेविका कौशल्याबाई शंकर पुरी यांच्या पार्थिंवावर उद्या दिनांक 7 जून रोजी सकाळी 11 वाजता सांगवी बुद्रुक येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . त्यांच्या पश्चात दोन मुले , सुना , तीन मुली , नातू , पंतू असा मोठा परिवार असून त्या सदाशिव पुरी यांच्या त्या मातोश्री होत.