नांदेड| जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात येणाऱ्या मौजे रोही पिंपळगाव येथील एका चिमुकल्या मुलीवरती अत्याचार करून खून करण्यात आला. खून करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी या मागणीचे निवेदन स्वराज्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.
संबंधित आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी, सदरील केस हे फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी, हे केस चालवण्यासाठी ज्या पद्धतीने दिल्ली हत्याकांड व कोपर्डीतील हत्याकांड प्रकरणात ज्या पद्धतीने सरकारी वकिलांची निवड करण्यात आली होती. त्याच पद्धतीने या केसमधील देखील माननीय उज्वलजी निकम साहेब यांची नेमणूक करण्यात यावी. तपासी अधिकाऱ्यांनी आरोप पत्र येत्या 8 दिवसात कोर्टात दाखल करावे.
शासनांनी मयताच्या कुटुंबियांना मनोधार्य योजना मधून तात्काळ दहा लक्ष रुपये व घरकुलाची योजना देण्यात यावी. जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित मयताच्या कुटुंबाला वरील प्रमाणे सहकार्य करावे अशी मागणी स्वराज्य संघटनेचे वतीने करण्यात आली. त्यावेळी स्वराज्य संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, मंगेश पाटील कदम, सदानंद पाटील पुयड, तिरुपती पाटील भगनुरे, व स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.