नांदेडसोशल वर्क

अन्यायग्रस्त आदिवासी जमातींचा लढा संघटितपणे तीव्र कारण्याचा संकल्प

नांदेड| आदिवासी कोळी,मन्नेरवारलू समाजाच्या प्रश्नावर संघटितपणे लढा तीव्र कारण्याचा संकल्प करण्यात आला.आदिवासी मन्नेरवारलू समाजाचे ज्येष्ठ नेते सोपानराव मारकवाड,मारोतराव देगालूरकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समारोप प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अन्यायग्रस्त आदिवासी कोळी महादेव,मन्नेरवारलू व ईतर 33 जमातीच्या न्याय्य मागण्यासाठी आदिवासीं कोळी समन्वय समितीच्या वतीने, 30 जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येत होते. जात प्रमाणपत्र,जात वैधता सहज मिळाव,वैधता नाकारणाऱ्या पडताळणी समित्या बरखास्त कराव्या,दाजीबा पाटील समिती अहवाल लागू करावा या व ईतर मागण्यासाठी राज्यभर आंदोलन चालू आहे.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेले अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर,शुक्रवारी रात्री दहा वाजता हे आंदोलन थांबवण्यात आले. शिवा संघटनेचे राज्य पदाधिकारी विठ्ठल ताकबिडे,आरक्षण हक्क संवर्धन समितीचे राज्य संघटक तथा फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे नेते श्याम निलंगेकर,यांच्या हस्ते अन्नत्याग आंदोलक मारोतराव देगलुरकर,सोपानराव मारकवाड यांना लिंबू पाणी पाजवून अन्नत्याग उपोषण सोडवण्यात आले.

अन्नत्याग आंदोलकासोबत समाज सुधारक मंडळाचे पदाधिकारी साखळी उपोषण करून पाठींबा दिला होता. समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय अन्नमवाड, बळीराम कोणेरी,ऍड.सुधीर राऊतवाड, अजयकुमार बंदेल,संभाजीराव कास्टेवाड,माधवराव अडबलवाड,बालाजीराव इंगेवाड,नारायण ऐनलोड,किशन अडबलवार,सचिन गंगेवार,बाबुराव इरलेवाड प्रा.उमेश बोधगीरे,नरेश मचकटवार यांच्यासह अन्य समाज बांधवांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!