नवीन नांदेड। मिसाईल मॅन, भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती ‘ वाचन प्रेरणा दिन’ म्हणून आपण साजरी करीत आहोत. त्याबरोबरच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी घालून दिलेला शुद्ध चारित्र्याचा आणि आचरणाचा वस्तू पाठही आपण आपल्या आचरणात आणण्याची प्रेरणा आजच्या दिवशी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी केले.
श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नांदेड येथे भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ. शेखर घूंगरवार पुढे म्हणाले, आजची परिस्थिती ही खूपच चिंताजनक आहे. आज वाचन संस्कृती लयास गेली आहे असे सगळ्यांना जाणवत आहे. या संस्कृतीला नव्याने बळ देण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यां सोबतच आजच्या साहित्य, शिक्षण, सांस्कृतिक तसेच कलाक्षेत्रातील विद्वत मंडळींची आहे. वाचन संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. व्ही.आर.राठोड, प्रा.एन.पी दींडे, कार्यालयीन अधीक्षक आर.डी. राठोड, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.जगदीश देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.नागेश कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. साहेबराव शिंदे यांनी मानले.
या वेळी प्रा डॉ. पि.बी. बिरादार,प्रा डॉ. जगदीश देशमुख,प्रा डॉ.एस व्ही. शेटे,प्रा डॉ.जी.वेणूगोपाल, प्रा डॉ. एम.के.झरे,प्रा डॉ. आर. एम. कांगणे,प्रा डॉ. नागेश कांबळे,प्रा डॉ.विजय मोरे,प्रा डॉ. साहेबराव मोरे,प्रा.डॉ.साहेबराव शिंदे,प्रा डॉ. संजय गिरे,प्रा डॉ. सुनिता गरुड , प्रा.सुधळकर ,प्रा.जायदे प्रा.पी.बी.चव्हाण, प्रा.कोतवाल, प्रा.झांबरे, प्रा.देवकते, प्रा.शेख, प्रा. ढाकणीकर, डॉ.एल.व्हीं. खरात, प्रा. कपिल हिंगोले, डॉ.राहुल सरोदे, प्रा. नितीन मुंडलोड, प्रा.भिमराव वानखेडे, प्रा.करण राठोड, प्रा. नागेश भुमरे, प्रा.शशीकांत हाटकर, डॉ अनिता भंडारे, प्रा.शेख मुशरफ, प्रा. अश्विनी जगताप, प्रा.आम्रपाली डोंगरे, यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.