नांदेड| गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मातंग समाजाच्या जीव्हाळ्याच्या मागण्या साठी अनेक वर्षापासून लहुजी शक्ती सेना राज्यामध्ये काम करते आहे. नागपूर येथे होत असलेले हिवाळी अधिवेशनावर मा.विष्णुभाऊ कसबे संस्थापक अध्यक्ष लहुजी शक्ती सेना यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चा च्या पार्श्वभूमीवर दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी पुणे येथून लहुजी तालीम गंजपेठ आघ्यक्रांतीगुरु लहुजी साळवे साळवे यांना अभिवादन करून मा. विष्णूभाऊ कसबे साहेब यांची आरक्षण क्रांती पायी पदयात्रा पुणे ते नागपूर या दिशेने निघाली आहे या आरक्षण क्रांती पदयात्रेचा समारोप १३ डिसेंबर 2023 रोजी यशवंत स्टेडियम नागपूर येथे होणार आहे. आणि त्याच अनुषंगाने लहुजी शक्ती सेनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक नांदेड येथे घेण्यात आली.
नांदेड येथील जिल्हा कार्यकारणी मधील प्रमुख पदाधिकारी या जिल्हा कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित होते नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यातील तालुकाध्यक्ष उपस्थित होते. या नागपूर येथे होणाऱ्या महामोर्चात मातंग समाजातील सर्वच तरुण तरुणी समाज बांधव सर्वांना या ठिकाणी आवाहन करण्यात आले की लाखोंच्या संख्येने या महामोर्चा सहभागी व्हा इथल्या शासनाला घाम होण्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने सहभागी झालं पाहिजे असे प्रदिपभाऊ वाघमारे यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले.
या बैठकीला श्री.नागोराव आंबटवार,श्री. संतोषभाऊ सूर्यवंशी,श्री.तानाजीराव गाडेकर,श्री.प्रीतम गव्हाले, श्री. नवनाथ वाकोडे,श्री.स्वप्नील गव्हाणे,श्री.भुजंगराव गायकवाड,श्री.बालाजी मेकाले,श्री.गजानन वाघमारे श्री.किशन इंगळे,श्री.मारुती पाडदे श्री.पुंडलिक लिंगायत, दयानंद वाघमारे,पवन जाधव, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष गयाबाई डोंमपल्ले. यमुनाबाई वाघमारे, पार्वतीबाई दूधकावडे,सुनिताताई गायकवाड, या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांचे निवडी करण्यात आले आणि संघटनेची दिशा ठरवण्यात आली.