
उस्माननगर, माणिक भिसे। येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद प्रा.शा.लाठ खुर्द ता . कंधार येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री गादेकरसर व उपस्थित मान्यवरांचा हास्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यांनंतर मुख्याध्यापक गादेकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर सार्वजनिक संविधान घेण्यात आले ,कुष्ट रोगाची सामुदायिक प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व यावर शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली.देशभक्तीपर गीतावर आधारीत सामुदायिक लेझिम विद्याठ्यार्थ्यानी सादरीकरण सादर केले.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे पडे ग्राम पंचायतच्या वतीने बक्षीस म्हणून देण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला . यावेळी गावातील प्रमुख सरपंच , उपसरपंच , सन्माननीय पदाधिकारी, चेअरमन , प्रतिष्ठित नागरिक, शिक्षणप्रेमी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्य क्रमाची सांगता करण्यात आली.गावातून प्रभात फेरी काढण्यात आली होती.
