शरदचंद्र महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा ‘चला वाचूया , स्वतःला घडवूया ‘ हा अभिनव उपक्रम संपन्न
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। 16 ऑक्टोबर 2023 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ .एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन व ‘चला वाचूया स्वतःला घडवूया ‘ हा अभिनव उपक्रम साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . के . हरीबाबू हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ प्रो. डॉ . बलभीम वाघमारे व दुसरे प्रमुख पाहुणे प्रो. डॉक्टर श्रीरंग वट्टमवार हे होते . प्रमुख पाहुणे प्रो डॉ .बलभीम वाघमारे यांनी आपल्या मनोगत मध्ये वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगून मानवी जीवनाचा विकास फक्त वाचनामुळे होऊ शकतो .
एक नावाड्याचा मुलगा देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो त्याचे कारण म्हणजे वाचनाची आवड मिळवलेल्या ज्ञानाच्या जोरावर आपण स्वतःचा व समाजाचा विकास घडवू शकतो असे मत व्यक्त केले . दुसरे प्रमुख पाहुणे प्रो. डॉ . श्रीरंग वट्टमवार यांनी भारतरत्न डॉ . एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला . एक सामान्य विद्यार्थी ते मिसाईल मॅन व राष्ट्रपती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा राहिला यावर त्यांनी भाष्य केले . तर अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ . के हरिबाबु यांनी भारतरत्न डॉ .अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यातून विद्यार्थ्यांनी बोध घ्यावा असे मत व्यक्त केल सदरील कार्यक्रम ग्रंथालय विभागातर्फे घेण्यात आला .
ग्रंथपाल डॉ .बी .आर . लोकलवार यांच्या संकल्पनेतून ‘चला वाचूया स्वतःला घडूया ‘ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला .यावेळी उपस्थित प्राध्यापक व वाचक यांना डॉ .एपीजे अब्दुल कलाम यांचा परिचय असणारे लेख सस्नेहरुपात देण्यात आले . सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ.बी .आर .लोकलवार यांनी केले . तर उत्कृष्ठ सूत्रसंचलन डॉ .संजय भालेराव यांनी केले . व आभार प्रा .डॉ सौ .महानंदा राऊत खेडकर यांनी मांडले .यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .