मनपा विधुत विभागाचे रत्नाकर जोशी सेवानिवृत्त
नांदेड। नांदेड वाघाळा शहर महापालिकेतील विद्युत विभागातील कार्यालय अधिक्षक तथा विधुत विभागात दमदार कामगिरी करणारे रत्नाकर देविदास राव जोशी हे ३१ आक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
१९८६ साली तात्कालीन महानगरपालिकेत त्यांची नेमणूक झाली होती, १९९७ ते २००२ या काळात महापौर सहाय्यक म्हणून काम पाहिले ,तर सन २००२ ते २०२३ पर्यंत विभागात कार्यारत होते, २००८ च्या गुरुतागध्दी सोहळ्यात विद्युत कामाचे उत्कृष्ट काम पाहिले, या बदल महापौर ,आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
३१ आक्टोबर रोजी सेवानिवृत्ती निमित्ताने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त सुंकेवार, डॉ. पंजाबराव खानसोळे,लेखा अधीकारी शोभा मुंडे, सहाय्यक आयुक्त सुधीर इंगोले, विधुत विभाग शहर अभियंता, विधुत विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्ती बदल सप्तनिक सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.