छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक 350 वा समारोह निमित्त शिवसंदेश पत्रकाच प्रकाशन
हिमायतनगर| लोकोत्सव समिती वाढोणा तर्फे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील प्रसिद्ध देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात सायंकाळी ६ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवगिरी प्रांतच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचा 350 वा समारोह आयोजित करण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे झाली, या 350 व्या राज्याभिषेक निमित्त शिवसंदेश पत्रकाच प्रकाशन कार्यक्रम लोकोत्सव समिती वाढोणातर्फे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवसंदेश पत्रकाच विमोचन करण्यात आले. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सिंहासनावर ठेवण्यात येऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी अजय बेदरकर नामक युवकांनी शिवगीत पठण केले, नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह चंद्रकांत खताळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवगाथा व त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतची संपूर्ण कथा उपस्थितांना सांगितली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.
शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष झाल्याबद्दल शिवसंदेश या पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा सिंहासनावर ठेवण्यात येऊन पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. शिवराज्याभिषेक ३५० व्य समारोह निमित्ताने छापण्यात आलेल्या शिवसंदेश पत्रिकेचा अनावरण महावीरचंद श्रीश्रीमाळ, श्यामजी रायेवार, कमलाकर दिक्कतवार, रामभाऊ सूर्यवंशी, गजानन चायल, अजय बेदरकर, गजानन मुत्तलवाड आदींसह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी…छत्रपती शिवाजी महाराज की जय… अश्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला.