नांदेड। प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना नोंदणीची सुरुवात नांदेड जिल्ह्यात करण्यात आली. प्रभू विश्वकर्मा मंदिर, कामठा खु. नांदेड येथे नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवानंद मिनगीरे, कार्यक्रमाचे उदघाटक आमदार राम पाटील रातोळीकर, प्रमुख अतिथी जिल्हा कौशल्य उद्योग अधिकारी श्रीमती रेणुका तम्मलवार व जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस.आर. सारंगधर हे होते.
उद्घाटक आ.राम पाटील रातोळीकर यांनी आपल्या भाषणात बोलताना प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना ही सर्व बारा बलुतेदारांसाठी सन्मानाने जीवन जगण्यासाठी परंपरागत व्यवसाय वाढविण्यासाठी ही योजना असून सर्वांनी याच लाभ घ्यावा असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात शिवानंद मिनगीरे यांनी विश्वकर्मा समाजातील बांधवांनी आपल्या व्यवसायाला कमी न समजता काम करावे. कौशल्य विकसित करण्यासाठी नवनवीन कौशल्य अवगत करुन स्वतः चा विकास करावा. कुठल्याही व्यवसायाची सुरुवात ही शुन्यापासून होत असते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी विश्वकर्मा सन्मान योजना सुरु करुन समाजाचा सन्मान वाढवला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी खरडे पाटील यांनी केले.
सुत्रसंचालन बाबाराव विश्वकर्मा यांनी केले. आभार प्रदर्शन केशव दादजवार यांनी मानले. या कार्यक्रमाचे संयोजन नागनाथराव पांचाळ लोहगावकर, बालाजी खरडे पाटील, केशव दादजवार, सुधाकरराव टाक, दत्ता तामसकर व सिताराम जांगिड यांनी केले. या कार्यक्रमासाठी बाबुराव पांचाळ उमरीकर, प्रभाकर पांचाळ, सत्यनारायण पांचाळ आलेगावकर, बालाजी पांचाळ, किशनराव पांचाळ, सुदर्शन पांचाळ व कामठा येथील समाजबांनी परिश्रम घेतले.