
नांदेड। आपण समाजातील एक घटक असून , समाजाचे देणं लागतोत ही भावना जोपासत नांदेड पतंजली योग परिवार दरवर्षी विविध उपक्रम राबवत असते. रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी नेरली कुष्ठधाम नांदेड या निसर्ग रम्य ठिकाणी कुष्ठरुग्ण व मतिमंद मुलांसोबत जेवण तसेच त्यांनी बनवलेले साहित्य खरेदी केले व स्वच्छता अभियान राबवले.
सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याला विवेक आहे, विचार करण्याची शक्ती आहे. कोणता ही प्राणी जे करू शकत नाही ते मनुष्य सहज करू शकतो. स्वतःसाठी तर सर्व प्राणी जगतात पण समाजातील दुर्बल असलेल्या दीनदुबळ्याला मदत करणे , त्यांना आनंद देणे , त्यांचं दुःख वाटून घेणे हे मनुष्याचे कर्तव्यच आहे. ही भावना जोपासत पतंजली योग परिवार नांदेड नेरली कुष्ठधाम येथील कुष्ठरुग्ण व मतिमंद मुलांसोबत सर्वांनी जेवणाचा आनंद घेतला तसेच स्वच्छता अभियान राबवले. त्यांनी बनवलेले काही साहित्य जसे सतरंजी, दिवाळीचे दिवे, पेपर प्लेट्स, गुलदस्ते आदी खरेदी करून त्यांना आर्थिक मदत – सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्या कलेची ही कदर – सन्मान केला. मुलांना कुष्ठरुग्ण काय व कसे असतात हे दिसले – कळले. मानवतेची सेवा – कर्तव्य म्हणजे काय, हे मुलांना कृतीतून समजले. कुष्ठरुग्णां विषयीची भीती व गैसमज ही दूर झाले.
नेरली कुष्ठधाम ला समाजातील इतर मंडळींनी ही सहकुटुंब भेटी द्याव्यात, असे आवाहन अनिल अमृतवार यांनी ह्या प्रसंगी केले. याप्रसंगी सर्वश्री पंढरीनाथ कंठेवाड, शंकर परकंठे, सिताराम सोनटक्के, अनिल कामीनवार, वसंतराव कल्याणकर, लता सूर्यवंशी, अरुणा मामुलवार, अदिती वानखेडे, सपना वानखेडे, मनीषा शिंदे, मीनाक्षी वायपणकर, कोमल वानखेडे, अनिता वानखेडे, शामा मालपाणी, मंगला पाटील, विष्णुदास शिंदे, उत्तमराव वट्टमवार, मलिकार्जुन कामठेकर, रंजना सोनटक्के, चंद्रकांत बोनगुलवार, अनिल कदम, सुनिता डांगे, पार्वती पटफळे, डॉ. सुनिता वैजवाडे, बालाजी शिंदे, पांडुरंग शिंदे, श्लोक वानखेडे, संजय सोनटक्के, प्रा. हनुमंतकर, ज्ञानोबा तेलंग, बालाजी वारले, पंडित पाटील, सतीश कुबडे, सदाशिव पाटील, पांडुरंग शिंदे, मंगाजी महाजन, गजानन सर्जे, व्यंकटराव कल्याणकर, अच्युत वायपनकर, कुमारी योगिता, कुमार गोविंद आदी उपस्थित होते. या प्रसंगी मराठवाडा लोकसेवा मंडळ नेरली नंदनवन तर्फे विश्वस्त मनोहरराव जाधव व कर्मचारी दिपक लोखंडे हे हजर होते.
