नांदेड। शहरामध्ये घडत असलेल्या मोटार सायकल चोरीचे गुन्हयावर आळा बसवुन गुन्हे उघडकिस आणण्याकरीता पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे साहेब, अपर पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार साहेब व उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग नांदेड शहर सुरज गुरव साहेब यांनी दिलेल्या आदेशप्रमाणे पोलीस निरीक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमलदार यांना पोलीस स्टेशन हददीत परिणामकारक पेट्रोलींग चालु ठेवुन गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हे उघडकिस आणण्याकरीता सुचना दिले होते.. सदरील सुचनाप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे दिनांक.
०६ / ११ / २०२३ रोजी सांयकाळी पो.स्टे हददीत खाजगी व शासकिय वाहनाने रवाना होउन पेट्रोलींग करीत असतांना, रात्री २०.२० वाजताचे दरम्यान ए.के संभाजी मंगल कार्यालयाजवळ मधील सार्वजनीक रोडवर एक इसम आपले ताब्यात विना नंबरची मोटार सायकल घेवुन थांबला. व तो पोलीस जिप पाहुन पळुन जात असतांना त्याचा पाठलाग करून इसम नामे गजानन जनार्धन नरवड वय १८ वर्ष रा. दत्तमंदीर परिसर सोनखेड ह.मु. तेहरानगर नांदेड असे सांगीतल्याने लगेच त्यास ताब्यात घेवुन पो. स्टे ला आणुन विश्वासात घेवुन विचारपुस केल्याने सदरील इसमाने त्याचे ताब्यातील मोटार सायकल हि विशालनगर मोर चौक येथुन चोरल्याचे सांगीतले याबाबत पडताळणी केली असता पो.स्टे भाग्यनगर येथे गु.र.न ४२८ / २०२३ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद असल्याने सदरील इसमाकडे अधिक चौकशी केल्यानरंतर त्याने नांदेड शहरामधुन वेगवेगळया ठिकाणावरून चोरलेल्या दोन मोटार सायकल असा एकुण ९०,०००/- रुप्याचा मुददेमाल जप्त करून चांगली कामगीरी केली आहे.
सदरील कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सुरज गुरव साहेब व पोलीस अधिक्षक सुर्यमोहन बोलामवाड पो.स्टे भाग्यनगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सुनिल अशोक भिसे, पो.हे.कॉ ७०९ दिलीप राठोउ, पो.हे.कॉ १०९८ गजानन किडे, पो.हे.. कॉ ८१८ प्रदिप गर्दनमारे, पोशि/ ५१६ हनुमंता कदम यांनी कामगीरी पार पाडली.